मुंबई : नागपंचमी (Nag Panchami 2022) हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील (Shravan Month) शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. देवतांच्या पूजेबरोबरच नागांच्या पूजेला नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकरांनी नागांना आपल्या गळ्यात धारण केले आहे. भगवान शिवभक्तांसाठी श्रावण महिना नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. या महिन्यात नागदेवता (Lord Snake) व भोलेनाथाची (Lord Shiva) विशेष पूजा केली जाते. नागपंचमी हा सण शुक्ल पंचमी तिथीला साजरा केला जातो. नागांच्या पूजेच्या या पवित्र सणाला हिंदू धर्मात (Hindu Religion) खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिवाच्या नाग देवतेचे पूजन (Nag panchami worship method and story)केले जाते. यावर्षी नागपंचमी सण 02 ऑगस्ट 2022 रोजी साजरा होणार आहे.
नागपंचमी पुजा-विधी (Nag panchami worship method and story) : नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. नागदेवतेला हळद, रोळी, तांदूळ, फुले अर्पण करून पूजा करावी. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून सर्पदेवतेला अर्पण करा. यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे. शेवटी नागपंचमीची कथा नक्की ऐका. शनीची साडेसाती किंवा वक्र दृष्टी जर एखाद्या व्यक्तीवर असेल, तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध पाजावे. कारण शनि हा सापांचा कारक मानला जातो आणि भगवान शंकराच्या गळ्यात नाग असतो. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर धातूपासून बनवलेला नाग अर्पण केल्यास; शनि साडेसातीचा वाईट परिणाम होत नाही. शनिदेवाच्या महादशेमुळे आर्थिक किंवा कौटुंबिक समस्या असल्यास; शिवलिंगावर लोखंडाचा नाग अर्पण करावा आणि असे केल्यावर पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेकही करावा.
नागपंचमी सणा बाबतच्या पौराणिक कथा :
1. हिंदू पौराणिक कथेनुसार ब्रह्माजींचा मुलगा कश्यप याला चार बायका होत्या. त्याच्या पहिल्या पत्नीपासून देवता, दुसऱ्या पत्नीपासून गरुड आणि चौथ्या पत्नीपासून राक्षसांचा जन्म झाला असे मानले जाते. परंतु त्याची तिसरी पत्नी कद्रू, जी नागा वंशाची होती; तीने नागांना जन्म दिला. असे मानले जाते.
2. पुराणानुसार, दिव्य आणि भौम असे दोन प्रकारचे साप सांगितले आहेत. दैवी नाग म्हणजे वासुकी आणि तक्षक. त्याचे वर्णन पृथ्वीचा वाहक असलेला आणि प्रज्वलित अग्नीसारखे तेजस्वी असे केले जाते. जर ते रागावले तर, ते संपूर्ण जगाला हिसकावून आणि केवळ दृष्टीक्षेपाने जाळून टाकू शकतात. त्यांच्या चाव्यावर कोणतेही औषध दिलेले नाही. पण जे साप जमिनीवर जन्माला येतात; ज्यांच्या दाढांमध्ये विष असते आणि जे माणसांना चावतात. त्यांची संख्या ऐंशी आहे.
3. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापदम, शंखपाल आणि कुलिक - हे आठ सर्प सर्व नागांमध्ये श्रेष्ठ आहेत, असे म्हणतात. या नागांपैकी दोन ब्राह्मण, दोन क्षत्रिय, दोन वैश्य आणि दोन शूद्र आहेत. अनंत आणि कुलिका - ब्राह्मण, वासुकी आणि शंखपाल - क्षत्रिय, तक्षक आणि महापदम - वैश्य आणि पद्म आणि कर्कोटक हे शूद्र आहेत. असे म्हटले जाते.
4. आख्यायिकेनुसार, जनमजेय जो अर्जुनाचा नातू आणि परीक्षितचा मुलगा होता. त्याने सापांचा सूड घेण्यासाठी आणि सर्पवंशाचा नाश करण्यासाठी एक सर्प यज्ञ केला होता. कारण त्याचे वडील, राजा परीक्षित यांचा; तक्षक नावाच्या सापाच्या चाव्यामुळे मृत्यू झाला होता. नागांच्या रक्षणासाठी हा यज्ञ जरतकरू ऋषींचा पुत्र आस्तिक मुनींनी बंद केला होता. ज्या दिवशी हा यज्ञ थांबला, तो दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी होती. तक्षक नाग आणि त्याचे बाकीचे वंशज यादिवशी नाशातून वाचले होते. येथूनच नागपंचमी उत्सव साजरा करण्याची परंपरा रूढ झाल्याचे मानले जाते.
नागपंचमीचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व : हिंदू धर्मात नाग देवतेची पूजा सुख, समृद्धी आणि सौभाग्य देणारी मानली जाते. असे मानले जाते की, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास शत्रूंचे भय राहत नाही. त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते. नागदेवतेची पूजा केल्याने, माणसाला जीवनात सर्पदंशाची भीती वाटत नाही. तसेच जन्मकुंडलीशी संबंधित कालसर्प दोष देखील दूर होतो.