ETV Bharat / city

पत्नीच्या डोक्यात दगड घालणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी १२ तासांत पकडले - केवळ 12 तासात अटक

भायखळा परिसरात फूटपाथवर राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिला ठार मारणाऱ्या आरोपीला केवळ 12 तासाच्या आत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीस अटक
आरोपीस अटक
author img

By

Published : May 20, 2021, 4:31 PM IST

Updated : May 20, 2021, 4:46 PM IST

मुंबई - शहरातील भायखळा परिसरात फूटपाथवर राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिला ठार मारणाऱ्या आरोपी पतीला केवळ 12 तासाच्या आत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राम किशोर यादव असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणानंतर उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अरोपीला अटक केली आहे.

केवळ 12 तासात अटक
19 मे रोजी भायखळा पूर्व येथील संत सावता मार्गावरील फूटपाथवर राहणाऱ्या राम किशोर यादव याचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले असता रागाच्या भरात त्याने एक दगड उचलून त्याच्या पत्नीच्या डोक्यात घातला. ही महिला गंभीर जखमी झाली होती. यानंतर आरोपी हा घटनास्थळाहून पसार झाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच महिलेस रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी कुठले सीसीटीव्ही फुटेज नसताना पोलिसांनी तांत्रिक तपास करत उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राम यादव याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्या महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. अटक आरोपी हा फुटपाथवर राहणारा असून त्याचा मुंबईत कुठलाही कायमचा पत्ता नसतानाही पोलिसांनी आपले कौशल्य लावून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या संदर्भात 302नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

हेही वाचा - 'बार्ज पी३०५' वरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले; १८८ जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरुच..

Last Updated : May 20, 2021, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.