मुंबई - 14 मे रोजी मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या एका बांधकाम साईटवर पाण्याच्या टाकीमध्ये एक मानवी सांगाडा मिळून आला होता. या प्रकरणी 4 आरोपींना बिहार व कर्नाटक येथून अटक करण्यात आली आहे.
अनैतिक संबंधातून झाला खून
अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींपैकी मुख्य आरोपीच्या पत्नीसोबत मृत युवकाचे अनैतिक संबंध गेल्या 1 वर्षांपासून होते. यामुळे मुख्य आरोपीच्या गावात त्याची बदनामी झाली होती आणि याचा राग मनात धरून त्याने युवकाचा काटा काढण्याचे ठरवले. मुख्य आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून युवकाला फूस लावून 13 मे रोजी मुंबईतील सीएसटी स्थानकाजवळ बोलावून घेतले. यानंतर जवळच असलेल्या बांधकाम साईटवर नेऊन त्याची हत्या केली. या नंतर युवकाचा मृतदेह सापडू नये व तो लवकर सडावा म्हणून बांधकाम साईटवरील जुन्या पाण्याच्या टाकीमध्ये त्यास फेकले. त्याचबरोबर पाण्याच्या टाकीमध्ये तब्बल 25 किलो मीठसुद्धा आरोपींनी टाकले.
हेही वाचा - मुंबईत 27 जूनपर्यंत तिसऱ्या स्थराचे निर्बंध, पालिका आयुक्तांचे परिपत्रक
पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल सिडीआर, सीसीटीव्ही फुटेजवरून तपास केला व 4 पैकी 3 आरोपींना कर्नाटक व एका आरोपीस बिहार येथून अटक केली. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - जागतिक योग दिन; योगासन आणि प्राणायामामुळे फुफ्फुसांची क्रियाशक्ती वाढते..