ETV Bharat / city

Kurla Rape Murder : कुर्ल्यातील एचडीआयएल कॉलनीत बलात्कार करून तरुणीची हत्या - rape & murder of 20-year-old girl in Mumbai's Kurla

महिलेची गळा कापून हत्या केल्याची घटना काल रात्री घडली आहे. शिवाय महिलेवर अतिप्रसंग झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सदर महिला कॉलनीतील इमारतीत कोणासोबत गेली होती. यासंदर्भात शोध घेणे सुरू आहे. महिलेची अद्याप ओळख पटली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.

file photo
file photo
author img

By

Published : Nov 27, 2021, 11:27 AM IST

Updated : Nov 27, 2021, 6:06 PM IST

मुंबई - मुंबईच्या कुर्ला ( Kurla ) परिसरामध्ये असलेल्या एचडीआयएल कंपाऊंडमधील ( HDIL Compound ) एका बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रूममध्ये एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. ही तरुणी आपल्या दोन मित्रांसोबत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शूट करण्यासाठी याठिकाणी गेली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल -

कुर्ला परिसरातील एचडीआयएल कंपाऊंडमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आला. कंपाऊंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर हा मृतदेह सापडल्यानंतर तातडीने राजावाडी रुग्णालयात ( Rajawadi Hospital ) पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून आसपासच्या पोलीस स्थानकांमध्ये बेपत्ता असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत का, याचीही खातरजमा पोलीस करत आहेत.

  • #WATCH | On rape & murder of 20-year-old girl in Mumbai's Kurla, DCP (Zone 5) Pranay Ashok says, "Special teams have been formed to ascertain the identity of the victim. CCTV footage is being checked... Post mortem report shows evidence of the sexual assault." pic.twitter.com/eKR75Y0HIB

    — ANI (@ANI) November 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विशेष पथके तयार -

डीसीपी (झोन 5) प्रणय अशोक ( DCP (Zone 5) Pranay Ashok ) यांनी सांगितले की, "पीडितेची ओळख पटवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे."

हेही वाचा - Minor Mother Kills Child : 15 वर्षीय अत्याचार पीडित आईने केली चिमुरड्याची हत्या

Last Updated : Nov 27, 2021, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.