मुंबई - बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात पालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेने सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामध्ये कंपनीला बांधकाम नियमित करण्यासाठी मुदतही देण्यात आली आहे.
![बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-notice-to-sony-channel-7205149_28042022190327_2804f_1651152807_911.jpg)
बेकायदेशीर बांधकामाला नोटीस - मालाड पश्चिम येथील लिंक रोडवर सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची इमारत आहे. इंटरफेस 7 या इमारतीमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या मजल्यावर बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. बांधकामाची परवानगी देताना जी मान्यता देण्यात आली आहे, त्यापेक्षा इतर काम केले आहे. यामुळे हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे पालिकेने म्हटले आहे. एमआरटीपीच्या 44 व्या कलमान्वये एका महिन्यात हे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करावा, अन्यथा हे बांधकाम पालिका तोडेल अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
![बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-notice-to-sony-channel-7205149_28042022190327_2804f_1651152807_18.jpg)