ETV Bharat / city

BMC Notice : राणा दाम्पत्याच्या खार येथील घरावर पालिकेची वक्रदृष्टी! अनधिकृत बांधकाम प्रकरणी बजावली नोटीस

मुंबई महानगरपालिकेने राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. इमारतीत अनधिकृत बांधकाम केल्याचा पालिकेला संशय असल्याने ही नोटीस लावण्यात आली आहे. 4 मे रोजी पालिकेचे अधिकारी घराची पाहणी करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.

राणा दाम्पत्य
राणा दाम्पत्य
author img

By

Published : May 3, 2022, 6:51 AM IST

Updated : May 3, 2022, 9:01 AM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी थांबताना दिसत नाही आहे. मुंबई महानगरपालिकेने आता खार येथील निवासस्थानी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली ( BMC Notice to Rana Couple ) आहे. इमारतीत अनधिकृत बांधकाम केल्याचा ( Rana Illegal Construction ) पालिकेला संशय असल्याने ही नोटीस लावण्यात आली आहे. 4 मे रोजी पालिकेचे अधिकारी घराची पाहणी करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. राणा दाम्पत्याला मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठन ( Hanuman Chalisa Reading ) करण्याच्या आग्रहानंतर अटक करण्यात आली. मात्र अजूनही त्यांना जामीन मिळाला नाही. ते दोघेही सध्या तुरूंगात आहे.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी बजावली नोटीस
अनधिकृत बांधकाम प्रकरणी बजावली नोटीस

तुरूंगातील मुक्काम वाढला - मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. त्याबाबची सुनावनी काल न्यायालयात पार पडली. राणा दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. 4 मे रोजी आता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शनिवार राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली होती. तेव्हा देखील न्यायालयाने मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. काल ( 2 मे ) त्यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी झाली. मात्र, वेळेअभावी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे उद्या ( बुधवार ) पर्यंत त्यांच्या कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

  • Maharashtra | Brihanmumbai Municipal Corporation (BMC) notice on Amravati MP Navneet Rana and MLA Ravi Rana's house in Khar area of Mumbai on the complaint of illegal construction in the building: BMC

    — ANI (@ANI) May 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Rana Couple Bail : राणा दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम वाढला; 'या' दिवशी होणार सुनावणी

काय आहे प्रकरण? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर आपण 23 तारखेला हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जात असल्याची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटले. राणा दाम्पत्याला अमरावतीतच अडवण्याचा प्रयत्न होणार होता, त्यामुळे त्यांनी गनिमीकावा करत एक दिवस आधीच मुंबई गाठली, 23 एप्रिलला शिवसैनिकांनी राणांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले गेलं. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर 30 एप्रिलला त्यांच्या जामीनावर सुनावणी घेण्यात आली. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आजही वेळेअभावी जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही आहे.

Last Updated : May 3, 2022, 9:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.