ETV Bharat / city

निसर्ग चक्रीवादळ; वाहनाच्या काचा फोडता येईल असे हत्यार सोबत ठेवा, महापालिकेच्या सूचना - निसर्ग चक्रीवादळ वृत्त मुंबई

मुंबईत अतिवृष्टी दरम्यान काही चारचाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. त्यामुळे पावसात चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

Mumbai
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 3, 2020, 5:13 AM IST

मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा पाऊस पडणार असून मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. २६ जुलै २००५ आणि त्यानंतर झालेल्या पावसात पाण्यात गाड्या अडकून त्यात नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसामुळे पाणी तुंबून पाण्यात कार, जीप सारख्या गाड्या अडकल्यास व ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादे साधन सोबत ठेवावे अशी सूचना मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे.

२६ जुलै २००५ च्या अतिवृष्टी दरम्यान काही चारचाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. गेल्या वर्षी २०१९ च्या पावसात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, ज्यात दोन व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. ही बाब लक्षात घेऊन व अशी घटना टाळता यावी, यासाठी काही अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या (३ जून) रोजी 'निसर्ग' चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या मुंबईतील काही भागात पाऊस सुरू झाला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. तथापी, काही आत्यंतिक गरजेपोटी घराबाहेर पडावयाचे झाल्यास व चारचाकी वाहनाने प्रवास करावयाचा झाल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रवास करण्यापूर्वी गाडीमध्ये काच फोडता येईल, असे हातोडा, स्टेपनी पान्हा यासारखे एखादे साधन ठेवण्यास विसरू नये. तसेच हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे हाताला लागेल अशाप्रकारे ठेवावे; अशी सूचनाही महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.