ETV Bharat / city

Navratri 21 : मुंबईत यंदाही 'गरबा'वर बंदी, वाचा मार्गदर्शक सूचना - मुंबई महापालिका

तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्याने पालिका सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, असे आवाहन सरकार आणि पालिकेने केले होते. त्यानंतर आता ७ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होत आहे. या सणाच्या वेळी गरबा आणि दांडीया निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, अशी भीती असल्याने पालिकेने गरबावर बंदी घातली आहे. त्याऐवजी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करावे, असे पालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.

गरबा
गरबा
author img

By

Published : Sep 30, 2021, 7:56 PM IST

Updated : Sep 30, 2021, 8:20 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असला तरी अद्याप कोरोना गेलेला नाही. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या वर्षीही सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकार आणि पालिकेने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर नवरात्री सणादरम्यान गरबावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत पालिकेने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून तसे परिपत्रक मुंबई महापालिकेकडून काढण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय -

मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्याने पालिका सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, असे आवाहन सरकार आणि पालिकेने केले होते. त्यानंतर आता ७ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होत आहे. या सणाच्या वेळी गरबा आणि दांडीया निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, अशी भीती असल्याने पालिकेने गरबावर बंदी घातली आहे. त्याऐवजी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करावे, असे पालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.

काय आहेत मार्गदर्शक तत्वे?

  • १) सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी नवरात्रोत्सव मंडळांना बृहन्मुंबई म.न.पा.ची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. त्यासाठीची ऑनलाइन परवानगी यंत्रणा तयार करुन ती २३.० ९. २०२१ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे.
  • २) कोविड-१९ या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि म.न.पा.चे या संबंधीचे धोरण लक्षात घेता मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिकरित्या स्थापन करण्यात येणाऱ्या देवीमूर्तीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
  • ३) देवींची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती मूर्तीकरिता २ फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
  • ४) यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. जेणेकरुन आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे कुटुंबियांचे कोविड १९ साथरोगापासून संरक्षण करणे शक्य होईल. घरी विसर्जन करता येणे शक्य नसल्यास नजिकच्या नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जन करावे.
  • ५) घरगुती देवीमुर्तीचे आगमन / विसर्जन मिरवणूकीच्या स्वरूपाचे नसावे. आगमनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा. जे उपस्थित असतील ते मारक / शिल्ड इत्यादी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत आणि सामाजिक अंतर पाळावे. शक्यतोवर या व्यक्तींनी कोविड-१९ या रोगाच्या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.
  • ६) सार्वजनिक देवीमूर्तीच्या आगमनाच्यावेळी व विसर्जनाच्यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील ते मारक/शिल्ड स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच शक्यतो सदर १० व्यक्तींनी कोविड-१९ या रोगाच्या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.
  • ७) नवरात्रौत्सवादरम्यान गरभ्याचे आयोजन केले जावू नये. तसेच,आरती,भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन शिथिल करण्यासंबंधीच्या शासनाच्या प्रचलित आदेशातील ( Break The Chair ) तरतुदींचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे.
  • ८) गरबा सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम उदा. रक्तदान शिबीरे इ. आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू , इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
  • ९) शक्यतो देवीमूर्तीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केवल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादीद्वारे, उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • १०) देवी मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक दूरीकरण (सोशल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मारक, सॅनीटायझर इत्यादी ) पाळणे बंधनकारक राहील. लॉकडाऊन संदर्भातील शासनाच्या ( Break The Chain) या प्रचलित आदेशामधील यासंबंधीच्या तरतुदी बंधनकारक असतील.
  • ११) मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जतुकीकरण ( Sanitisation ) करावे, तसेच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ती यांना वापरासाठी Sanitizers उपलब्ध करुन द्यावेत.
  • १२) नवरात्रौत्सव २०२१ साजरा करतेवेळी आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना पसंती देण्यात यावी.
  • १३) शक्यतो व्यावसायिक जाहिराती करु नयेत.
  • १४) कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे / फूले व हार अर्पण करणे बाबीला शक्यतो आळा घालावा.
  • १५) नवरात्रौत्सव मंडपाच्या परिसरात तसेच त्या लगतच्या रस्त्यांवर फुले, हार, प्रसाद विक्रीसाठी स्टॉल दुकाने लावू नयेत.
  • १६) कोराना विषाणूच्या गंभीर आपत्ती लक्षात घेता गर्दी होवू नये म्हणून मंडप सजावट, रोषणाई /देखावे करु नयेत. त्याचप्रमाणे गरव्याचे आयोजन करू नये.
  • १७) मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी, लोकापयोगी आरोग्याभिमूख कार्यक्रम आयोजित करावेत.
  • १८) नवरात्रौत्सवादरम्यान धार्मिक, भक्तीपर गर्दी जमा होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे.
  • १९) मंडपात एका वेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्यावी. उपस्थित सर्व व्यक्तिंनी मास्क लावणे बंधनकारक आहे व सामाजिक अंतर ठेवणे याचे काटेकोरपणे पालन होते आहे, हे पाहण्याची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्याची राहील.
  • २०) देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहा पेक्षा जास्त कार्यकर्ते, भाविक उपस्थित असू नयेत. त्यांनी मास्क आणि सामाजिक अंतरासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • २१) देवींच्या विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विसर्जन पार पाडणे आवश्यक राहील. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीमूर्ती एकत्रितरित्या विसर्जनास नेऊन गर्दी करण्यास परवानगी असणार नाही.
  • २२ ) सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्यंत धीम्या गतीने नेवू नये, तर वाहनातील देवीमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्य गतीने वाहन विसर्जनस्थळी घेवून जावे. विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना देवीमूर्तीचे दर्शन घेवू देण्यास / पूजा करुन देण्यास सक्त मनाई आहे.
  • २३) नैसर्गिक विसर्जन स्थळी देवीमूर्तीचे विसर्जन करताना नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही. नैसर्गिक विसर्जनस्थळी मूर्ती संकलनाची व्यवस्था संबंधित विभाग कार्या लयामार्फत करण्यात येईल. नागरिकांनी तेथे मूर्ती जमा कराव्यात व त्यांचे विसर्जन महापालिकेमार्फत करण्यात येईल.
  • २४) नैसर्गिक विसर्जन स्थळी प्रकाश योजना, जनरेटर, तात्पुरती स्वच्छतागृहे आदी आवश्यकतेनुसार दरवर्षी केली जाणारी व्यवस्था चोखपणे करण्यात येईल.
  • २५) शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मुखपट्टयांचा ( Masks ) वापर व सामाजिक अंतर ( social distancing ) संबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  • २६) कोविड साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने, महापालिकेने तसेच पोलीस प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे.
  • २७) ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने विहीत करण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन पोलीस, महापालिका प्रशासनास सहकार्य करावे.
  • २८) नवरात्रौत्सवाच्या विसर्जनाच्या तारखेस जर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर त्या सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करुन मूर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहील.
  • २९) घर / इमारत नवरात्रौत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.
  • ३०) जर विसर्जनाच्या तारखेच्या दिवशी घरगुती देवीमूर्ती स्थित असलेली इमारत, चाळ जर सिल्ड इमारत ( sealed building ) मध्ये असेल तर त्यांना विसर्जनासाठी घरगुती देवीमूर्ती बाहेर घेवून जाण्यास परवानगी असणार नाही. त्यांना सदर देवीमूर्तीचे विसर्जन बादलीमध्ये किंवा ड्रममध्ये करणे बंधनकारक राहील.
  • ३१) उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 व भा.द.वि. 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल. या दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यास त्याचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहिल.
  • ३२) राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

हेही वाचा - केवळ पालिकेच्या शाळांचे निर्जंतुकीकरण करणे हा मुंबई महापालिकेचा भेदभाव - अनिल बोरनारे

Last Updated : Sep 30, 2021, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.