ETV Bharat / city

घरी जाऊन तपासणीनंतरच कोविड रुग्णांना बेड्सचे वितरण - पालिका आयुक्तांचे आदेश

घरी जाऊन तपासणीनंतरच कोविड रुग्णांना बेड्सचे वितरण केले जाणार असल्याचे आदेश पालिका आयुक्तांनी काढले आहेत. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी एक विशेष बैठक घेतली असून या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 23, 2021, 8:08 PM IST

मुंबई - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बेड्स कमी पडत आहेत. रुग्णांना बेड्स मिळत नसल्याने नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील लक्षणे असणाऱ्या कोविड बाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सचे वाटप हे वैद्यकीय तपासणीनंतरच करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज दिले आहेत. विशेष म्हणजे ही वैद्यकीय तपासणी रुग्णाच्या घरी भेट देऊन केली जाणार आहे. यामुळे रुग्णालयात बेड्स अडवून बसणाऱ्याना चाप बसून गरजूना बेड्स मिळू शकणार आहेत.

आढावा बैठक -

मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. पालिका आणि आरोग्य विभागाने कोरोनाचा प्रसार काहीसा कमी केला होता. मात्र, पुन्हा फेब्रुवारीपासून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रोज ७ ते ११ हजार रुग्ण नव्याने आढळून येत असल्याने बेड्सची कमतरता जवणावू लागली आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता असल्याने ते मिळत नसल्याने नातेवाईकांची दमछाक होत आहे. यामुळे सतत पालिकेला टिकेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत सामान्य बेड्स, ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयू बेडसचे वितरण करण्याबाबत पालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

रविवारपासून अंमलबजावणी -

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाची माहिती लॅबकडून मिळाल्यावर रुग्णाच्या घरी जाऊन डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्या प्रत्येक म्हणजेच २४ विभागात १० वैद्यकीय टीम्स तयार केल्या जाणार आहेत. या टीम्स घरी जाऊन रुग्णांची तपासणी करून त्याच्या गरजेनुसार बेड्सचे वितरण केले जाणार आहे. या वैद्यकीय टीमसाठी पालिकेच्या २४ विभागात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. रविवार पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या वेळेत होणार तपासणी -

रुग्णांची वैद्यकीय तपासणीची कार्यवाही ही सकाळी ७.०० ते रात्री ११.०० या कालावधी दरम्यान करण्यात येईल. रात्री ११.०० ते सकाळी ७.०० या कालावधीमध्ये एखाद्या रुग्णाची वैद्यकीय तपासणी तातडीने करणे गरजेचे असल्यास अशी तपासणी महापालिकेच्या जम्बो कोविड उपचार केंद्रांमध्ये केली जाईल. याबाबत देखील आवश्यक ते सर्व समन्वयन हे ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारेच केले जाणार आहे. एखाद्या रुग्णास वैद्यकीय चमुने ज्या प्रकारच्या बेड्चे वितरण करण्याचे सुचविले आहे, त्या प्रकारचे बेड्स उपलब्ध नसल्यास त्या रुग्णाला प्रतिक्षा यादीवर ठेवण्यात येईल व काही तासांनी बेड उपलब्ध झाल्यानंतर बेडचे वितरण करण्यात येईल.

दूरध्वनींची संख्या वाढवली -

‘वॉर्ड वॉर रुम’कडेयेणाऱ्या दूरध्वनींची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रुम’मधील दूरध्वनी क्रमांकाला ३० हंटिंगलाइनची सुविधा एम.टी.एन.एल.कडून उपलब्ध करून घेण्याचे आदेश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.