ETV Bharat / city

मुंबईत पावसाचा कहर; नायर रुग्णालयाच्या कोव्हिड विभागात शिरले पाणी; रुग्णांचे हाल

author img

By

Published : Sep 23, 2020, 11:59 AM IST

Updated : Sep 23, 2020, 12:05 PM IST

मुंबईत मंगळवारी रात्री पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नायर रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरच्या ओपीडीमध्ये पाणी शिरल्याचा प्रकार घडला आहे.रुग्णालयाय समोरील परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. परिणामी रुग्णालयात पाणी शिरल्याने कोरोना संबंधित तपासणी सध्या बंद आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Nair Hospital flooded
नायर रुग्णालयाच्या कोव्हिड विभागात पावसाचे पाणी

मुंबई - राज्याची राजधानी मुंबईमध्ये मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील सखल भागात मोठ्या प्रमाणात साचले असून महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयालाही याचा फटका बसला आहे. या रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील कोव्हिड विभागाची ओपीडीही पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे रुग्णांच्या तपासणीपासून ते चाचणीपर्यंत सर्व सेवा ठप्प असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान रुग्णालया समोरच्या रस्त्यावरही पाणी असल्याने रुग्ण वा इतर कुठलीही वाहने रुग्णालयापर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळे कोव्हिड रुग्णांना इतरत्र हलवणेही शक्य नाही.

नायर रुग्णालयाच्या कोव्हिड विभागात पावसाचे पाणी;

नायर रुग्णालय ज्या परिसरात आहे, तो परिसरही सखल भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुंबईत जराही मोठा पाऊस झाला की नायर रुग्णालयाच्या परिसरात पाणी साचते. आजही नायर रुग्णालया समोरील रस्ता आणि डीन पार्किंगचा परिसर पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. याच डीन पार्किंग परीसरात कोव्हिड सेंटरची ओपीडी आहे. या ओपीडीत रात्री 3 वाजल्यापासून पाणी भरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.संशयित कोव्हिड रुग्णांची येथे तपासणी आणि चाचणी या ओपोडीत केली जाते. मात्र, आता या ओपीडीतच पाणी शिरल्याने मंगळवारी रात्रीपासून रुग्णसेवा ठप्प झाली आहे. दरम्यान रात्री आलेल्या वा आता पाण्यातून कशीबशी वाट काढून येणाऱ्या रुग्णांना इतर अपघात विभागात बसवण्यात येत आहे. काही तासात रुग्णालय परिसरातील पाणी ओसरेल त्यानंतर ओपीडी सेवा सुरू होईल, असे रुग्णालयाकडून सांगितले जात आहे. दरम्यान यासंबंधी नायर रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Last Updated : Sep 23, 2020, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.