ETV Bharat / city

Dams Water Storage Increased In Mumbai : मुंबईत मुसळधार!; धरणांमध्ये १ दिवसात महिनाभराचा पाणीसाठा वाढला - जूनमध्ये असमाधानकारक पाऊस

मुंबईच्या धरण क्षेत्रात एका दिवसात ६.८६ टक्के ९९, ३८५ दशलक्ष लिटर इतका म्हणजेच २८ दिवसांचा पाणीसाठा वाढला ( Dams Water Storage Increased ) आहे. पावसाचा जोर चांगला ( Heavy rain Fall in Mumbai ) असल्याने मुवईकरांनी महिनाभराचा तहान एका दिवसात भागली आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या ९९, ३८५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे.

Dams Water Storage Increased
धरणांचा पाणीसाठा वाढला
author img

By

Published : Jul 8, 2022, 2:12 PM IST

Updated : Jul 8, 2022, 4:27 PM IST

मुंबई - जूनच्या अखेरपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस ( Heavy rain Fall in Mumbai ) पडत आहे. यामुळे गेल्या ७ दिवसात ८.९२ टक्के म्हणजेच १,२९,१२३ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली होती. ७ जुलै पासून ८ जुलैपर्यंत एका दिवसात ६.८६ टक्के ९९, ३८५ दशलक्ष लिटर इतका म्हणजेच २८ दिवसांचा पाणीसाठा वाढला ( Dams Water Storage Increased ) आहे.

मुंबईत १० टक्के पाणी कपात - मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे हा पाणीसाठा जमा होत होता. मात्र यंदा जून महिन्यात समाधान कारक पाऊस पडलेला नाही ( Less rain in June ) . यामुळे महानगरपालिकेने १० टक्के पाणी कपात लागू करण्यास सुरूवात केली होती. धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यामधील ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या १० टक्के पाणी कपात असल्याने ३ हजार ४६५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे.

एका दिवसात महिनाभराचा पाणीसाठा वाढला - मुंबईत २९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २९ जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. समाधानकारक पाऊस झाल्याने ७ जुलैला २ लाख ७६ हजार १२९ दशलक्ष लिटर १९.०८ टक्के पाणीसाठा जमा झाला. २९ जून ते ७ जुलै या दरम्यान ८.९२ टक्के म्हणजेच १,२९,१२३ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली. ७ ते ८ जुलै २४ तासात धरणात ३,७५,५१४ दशलक्ष लिटर २५.९४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. एका दिवसात ६.८६ टक्के ९९,३८५ दशलक्ष लिटर इतका म्हणजेच २८ दिवसांचा पाणी साठा वाढला आहे. सध्या धरणात १०८ दिवसांचा पाणी साठा जमा झाला आहे. मुंबईला ३ महिने १८ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

१०८ दिवसाचा पाणीसाठा - मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत येतो. सध्या १० टक्के पाणी कपात असल्याने ३४६५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे.

प्रत्येक आठवड्याला आढावा - मुंबईमध्ये पाऊस पडला नसल्याने धरणामध्ये १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याला पाणीसाठा किती आहे याचा आढाव घेतला जाईल. पुढील महिन्यापर्यंत पाऊस चांगला पडला तर पाणी कपातीचे प्रमाण कमी केली जाईल. पाऊस पडला नाही तर पाणी कपातीमध्ये वाढही केली जाऊ शकते. धरणातील पाणीसाठा किती आहे त्याकडे आमचे लक्ष आहे. पाणी साठयाच्या नुसार पुढील उपाययोजना आणि नियोजन केले जाईल अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.

८ जुलैला पाणीसाठा - २०२२ मध्ये ३,७५,५१४ दशलक्ष लिटर (२५.९४ टक्के) आहे. २०२१ मध्ये २,६३,६३१ दशलक्ष लिटर (१८.२१ टक्के) पाणीसाठा होता. २०२० मध्ये २,५३,२५८ दशलक्ष लिटर (१७.५० टक्के) पाणीसाठा होता.

धरणातील पाणीसाठा - मोडक सागर धरणात ७०,२८५ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तानसा धरणात ५१,५२९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा ३४,३५८ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. भातसा २,०२,३८८ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. विहार धरणात १२,०११ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तर तुळसी धरणात ४,९४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे

हेही वाचा - शिवसेनेला मोठा धक्का! ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील ५५ नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील

Last Updated : Jul 8, 2022, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.