ETV Bharat / city

'या' पद्धतीचा वापर करून १०० किलोमीटरवरून मुंबईकरांना मिळते पाणी, जाणून घ्या सविस्तर - मुंबईला पाणीपुरवठा कसा होतो

मुंबईला (Mumbai water supply system) सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी ५ धरणे मुंबई बाहेर आहेत. १०० किलोमीटरपेक्षा (Mumbaikars get water from 100 km)अधिक लांबीवर असलेल्या या धरणांमधून मुंबईला ३८५० दशलक्ष लिटर रोज पाणी पुरवठा (water suppy by gravitation) केला जातो. हे पाणी फक्त गुरुत्वाकर्षण पद्धतीने मुंबईकरांना उपलबध करून दिले जाते. विशेष म्हणजे यामधील काही धरणे ही इंग्रजांच्या काळापासून आहेत.

Mumbaikars get water from 100 km using this method know in detail mumbai water suppy by gravitation
१०० किलोमीटरवरून 'या' पद्धतीचा वापर करून मुंबईकरांना मिळते पाणी, जाणून घ्या सविस्तर
author img

By

Published : Sep 26, 2022, 9:31 PM IST

मुंबई: मुंबईला भातसा, मोडक सागर, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार आदी धरणांमधून दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा तानसा आणि मोडक सागर या दोन लाईनमधून केला जातो. मुंबईपासून तानसा धरणाचे अंतर हे १०६ किलोमीटर आहे. तर मोडक सागर धरणाचे अंतर १२० किलोमीटर इतके आहे. तानसा हे धरण १८९२ मध्ये इंग्रजांच्या काळात बांधले आहे. तर मोडक सागर हे धरण १९५४ मध्ये बांधण्यात आले आहे.

गुरुत्वाकर्षण तत्वाचा उपयोग (water suppy by gravitation) मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे मुंबईच्या बाहेर आहेत. यामुळे इतक्या लांबीवरून पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान होते. मात्र तानसा धरण बांधले तेव्हापासून मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे पाईपलाईन टाकताना गुरुत्वाकर्षण तत्वाचा उपयोग करण्यात आला आहे. या पाईपलाईनद्वारे मुंबईला शंभर वर्षाहून अधिक काळ कोणतेही अडथळे निर्माण न होता पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता (BMC Water Engineer) पुरुषोत्तम मालावडे यांनी दिली.

१०० किलोमीटरवरून 'या' पद्धतीचा वापर करून मुंबईकरांना मिळते पाणी, जाणून घ्या सविस्तर

असा केला जातो पाणीपुरवठा मुंबईला रोज ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी ४७ टक्के पाणीपुरवठा मोडक सागर, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार धरणातून होतो. तर भातसा या धरणातून ५३ टक्के म्हणजेच २०२० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. त्यामधील १३०० दशलक्ष लिटर इतके पाणी पिसे पांजरापूर या शुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. हे शुद्ध केलेले पाणी लाईन १ मधून मुंबईला पाठवले जाते. तर इतर पाणी मुंबईच्या भांडुप कॉम्प्लेक्स येथील शुद्धीकरण प्रकल्पात पाठवले जाते. येथे पाणी शुद्ध करून मुंबईत सर्वत्र पाठवले जाते. शुद्ध केलेले पाणी भांडुप, बोरिवली, वेरावली, वाकोला, अंधेरी, घाटकोपर, मलबार हिल आदी २७ ठिकाणच्या सर्व्हिस रिझर्व वायरमध्ये पाठवले जाते. त्यामधून ते पाणी नागरिकांच्या घरी पाठवले जाते असे मालावडे यांनी सांगितले.

इतका होतो पाणीपुरवठा मुंबई शहराला सध्या तानसा-४५५ द.ल.लि. प्रतिदिन, मोडक सागर वैतरणा-४५५ द.ल.लि. प्रतिदिन, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा- ४५५ द.ल.लि. प्रतिदिन, अप्पर वैतरणा-६४० द.ल.लि. प्रतिदिन, भातसा- २०२० द.ल.लि. प्रतिदिन या जलस्रोतातुन पाणीपुरवठा करण्यात येतो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० कि.मी. वा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ दोन लहान स्रोत विहार-९० द.ल.लि. प्रतिदिन आणि तुळशी- १८ द.ल.लि. प्रतिदिन आहेत. मुंबई शहराला या सर्व जलस्त्रोतातून ३८५० द.ल.लि. प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

११ हजार कर्मचाऱ्यांची मेहनत मुंबई शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी दररोज सुमारे ११५० अभियंते व ८९५० कामगार व इतर कर्मचारी वर्ग कार्यरत असतो.

नव्या प्रकल्पांची आवश्यकता भविष्यात पालिकेला ४ ते ५ हजार दशलक्ष लिटर पाणी रोज लागणार आहे. त्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगा हे प्रकल्प प्रस्तावित आहेत. गरज भासेल त्यानुसार ही धरणे बांधली जाणार आहेत. या तीन धरणांमधून सुमारे २८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाऊ शकतो अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता पुरुषोत्तम मालावडे यांनी दिली. सध्या पालिकेने समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मनोरी येथे २०० दशलक्ष लिटरचा हा प्रकल्प आहे असेही मालावडे यांनी सांगितले.

काय आहे गुरुत्वाकर्षण? सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. कोणतीही वस्तू वरून पडली तर ती खाली पडते. याच तत्वाचा वापर करत पालिकेने इंग्रजांचे राज्य असताना केला होता. १०० किलोमीटर पाणी पोहवण्यासाठी पाईपलाईन टाकताना गुरुत्वाकर्षण पद्धतीने ते मुंबईपर्यंत पोहचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे धरणातून पाणी सोडल्यावर ते थेट भांडुप कॉप्लेक्सपर्यंत जल शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पोहचते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.