ETV Bharat / city

विविध मागण्यासाठी वाडिया हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून आंदोलन - वाडिया हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून आंदोलन

महापालिका आणि राज्य सरकारकडून वाडिया हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन देण्यात येणार होते. पण, तो अजून देण्यात आलेला नसल्याने कर्मचारी काळी फित लावून आंदोलन करत आहे. शिवाय, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

wadiya hospital
वाडिया हॉस्पिटल
author img

By

Published : Jul 15, 2020, 11:54 AM IST

Updated : Jul 15, 2020, 12:06 PM IST

मुंबई - जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि प्रसूतीगृह या दोन्ही हॉस्पिटलमधील कर्मचारी काळी फित लावून कामावर रुजू राहून आंदोलन करत आहेत. लाल बावटा जनरल कामगार युनियनकडून हे आंदोलन केलं जात आहे. हॉस्पिटलला अनुदान नसल्याने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बंद केले आहे. तर बालरुग्णांची होणारी हेळसांड या आंदोलनातून मांडण्यात येणार आहे.

विविध मागण्यासाठी वाडिया हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून आंदोलन

महापालिका आणि राज्य सरकारकडून वाडिया हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन देण्यात येणार होते. पण, तो अजून देण्यात आलेला नसल्याने कर्मचारी काळी फित लावून आंदोलन करत आहे. शिवाय, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या
- सहाव्या वेतनाची थकबाकी / थकीत अनुदानाची रक्कम 10 कोटी 10 लाख रुपये त्वरित द्यावी
- सन 2015-16 च्या कामगारांना हॉस्पिटल सेवेत कायम ( परमनंट ) करा.
- कामगारांना प्रमोशन व इनक्रिमेंट द्यावी
- माहे मार्च , एप्रिल , मे चा भत्ता रुपये 300/- देण्यात यावा.
- 50 लाखाचा इन्शुरन्स कोविडमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मिळाला पाहिजे
- कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

अशा एकूण 10 मागण्यासाठी कर्मचारी लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली काळी फित लावून आंदोलन करत आहे. या आधी बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि प्रसूतीगृह या दोन्ही हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी १३ जानेवारीपासून तीन दिवस धरणे आंदोलन केलं होते. तेव्हाही लाल बावटा जनरल कामगार युनियनकडून हे धरणे आंदोलन केले गेले. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत हॉस्पिटलच्या बाहेर कर्मचाऱ्यांकडून निदर्शने केली गेली. हॉस्पिटलला अनुदान नसल्याने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बंद केले गेले. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला. त्यात महापालिका आणि राज्य सरकारकडून वाडिया हॉस्पिटलला २०० कोटींचा निधी देण्यात येणार होता. पण, तो त्या वेळेस देण्यात आलेला नसल्याने कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.

Last Updated : Jul 15, 2020, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.