मुंबई 20 ऑगस्ट 2022 मुंबई विद्यापीठात सोबत संलग्न असलेल्या महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये जे विद्यार्थी पीएचडीसाठी प्रवेश घेत आहेत. त्यांची पीएचडीच्यासाठी पात्रता परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. पात्रता परीक्षा संदर्भात ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही 22 ऑगस्ट 2022 सायंकाळी 4 वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली महाराष्ट्रात विद्यापीठ आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी पीएचडी करिता पात्रता परीक्षा द्यावी लागते. ज्याला पात्रता परीक्षा PET 2022 असं म्हटलं जातं आहे. या संदर्भात मुंबई विद्यापीठाकडून संचालक डॉक्टर विनोद पाटील यांनी जाहीर केले आहे की, पीएचडीसाठीच्या 2022 च्या पात्रता परीक्षा करिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून 22 ऑगस्ट 2022 सायंकाळी 4 वाजेपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
तसेच पेट 2022 यासाठी अर्ज करत असताना मॉक टेस्टसाठी दिनांक 20 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने मॉक टेस्टसाठीचा देखील अर्ज करता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी यासंदर्भातली नोंद घेऊन पीएचडीच्या पात्रता प्रवेशासाठीची सर्व कागदपत्रे खात्रीपूर्वक करून तारीख आणि वेळेमध्ये अर्ज करावा, अशी माहिती डॉक्टर विनोद पाटील संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ मुंबई यांनी ईटीव्ही भारत बोलताना सांगितले आहे.
हेही वाचा Chhota Rajan Accomplice Arrest छोटा राजनने दिली होती चक्क बैलाच्या हत्येची सुपारी, मारेकरी अटकेत