ETV Bharat / city

मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेचे वेळापत्रक जुन्या पद्धतीने - university

प्रस्तावित वेळापत्रक २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांसाठी लागू न करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० पासून मात्र हा प्रस्ताव लागू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे.

मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Mar 7, 2019, 5:03 AM IST

मुंबई - कला, वाणिज्य, विज्ञान आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा आणि त्यांचे वेळापत्रक जाहीर करून २ आठवडे झाले. मात्र अभियांत्रिकी परीक्षेचे वेळापत्रक अजूनही जाहीर होऊ शकले नाही. याबाबत विद्यापीठाने एक नवा खुलासा करत अभियांत्रिकीच्या परीक्षेचे वेळापत्रक जुन्या पद्धतीने लवकरच जाहीर करु असे सांगितले आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिलेल्या नवीन नियमानुसार घेणे अपेक्षित असते. यात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमच नाही तर प्रत्यक्षात विविध कंपन्या, उद्योग, आदी ठिकाणी इंटर्नशीप देणे आवश्यक होते. मात्र बहुतांश महाविद्यालयांनी याला प्रतिसाद दिला नसल्याने विद्यापीठाच्या या परीक्षाचे वेळापत्रक लांबणीवर पडले आहे. विद्यापीठाने आता या परीक्षा जुन्याच पद्धतीने घेण्याचा आज निर्णय घेतला आहे.

अभियांत्रिकी शाखेच्या ४ वर्षांच्या पदवीमध्ये एकूण ८ सत्रांच्या परीक्षा असल्यामुळे परीक्षेचा कालावधी साधारणपणे १ महिन्यापेक्षा अधिक लागतो. त्यामुळे त्याच्या निकालासही विलंब होतो. विद्यार्थ्यांना इंटर्नशीप देणे आवश्यक असल्यामुळे अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठात्यांनी, अभियांत्रिकी शाखेच्या प्राचार्यांच्या बैठकीत मांडला होता. या प्रस्तावानुसार अभियांत्रिकी शाखेच्या सत्र निहाय परीक्षेतील एका पेपरनंतर दुसऱ्या पेपरमध्ये एक दिवसाची सुट्टी ठेवण्यात आली होती. यानुसार या परीक्षा कमी दिवसात संपतील. जेणेकरून विद्यापीठास उन्हाळी सत्राचे निकाल लवकर जाहीर करता येतील, तसेच परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उद्योगामध्ये इंटर्नशीप करता येईल अशा प्रकारचा प्रस्ताव विद्यापीठाच्या विचाराधीन होता. याच या प्रस्तावाच्या संदर्भात अनेकांकडून वेगवेगळ्या सूचना विद्यापीठास प्राप्त झाल्या,

undefined

Intro:अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी विद्यापीठ म्हणते, आता वेळापत्रक जुन्या पद्धतीने करू Body:अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी विद्यापीठ म्हणते, आता वेळापत्रक जुन्या पद्धतीने करू
मुंबई, ता. ६ :
कला, वाणिज्य, विज्ञान आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा आणि त्यांचे वेळापत्रक जाहीर करून दोन आठवडे उलटून जात असताना अभियांत्रिकी परीक्षेचे वेळापत्रक मात्र अजूनही जाहीर होऊ शकले नाही. यासाठी आज विद्यापीठाने एक नवा खुलासा करत आम्ही अभियांत्रिकीच्या परीक्षेचे आता वेळापत्रक जुन्या पद्धतीने लवकरच करू असे जाहीर केले आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिलेल्या नवीन नियमानुसार घेणे अपेक्षित होते. यात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमच नाही तर प्रत्यक्षात विविध कंपन्या, उद्योग, आदी ठिकाणी इंटर्नशीप देणे आवश्यक होते. मात्र बहुतांश महाविद्यालयांनी याला प्रतिसाद दिला नसल्याने विद्यापीठाच्या या परीक्षाचे वेळापत्रक लांबणीवर पडले असल्याने विद्यापीठाने आता या परीक्षा जुन्याच पद्धतीने घेण्याचा आज निर्णय घेतला आहे.
अभियांत्रिकी शाखेच्या चार वर्षाच्या पदवीमध्ये एकूण आठ सत्रांच्या परीक्षा असल्यामुळे परीक्षेचा कालावधी साधारणपणे १ महिन्यापेक्षा अधिक लागतो, त्यामुळे त्याच्या निकालासही विलंब होतो. यासाठी या परीक्षेचा कालावधी कमी करण्याचा तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमानुसार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंटर्नशीप देणे आवश्यक असल्यामुळे अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठात्यांनी, अभियांत्रिकी शाखेच्या प्राचार्यांच्या बैठकीत मांडला होता. या प्रस्तावानुसार अभियांत्रिकी शाखेच्या सत्र निहाय परीक्षेतील एका पेपर नंतर दुसऱ्या पेपरमध्ये एक दिवसाची सुट्टी ठेवण्यात आली होती. यानुसार या परीक्षा कमी दिवसात संपतील. जेणेकरून विद्यापीठास उन्हाळी सत्राचे निकाल लवकर जाहीर करता येतील, तसेच परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उद्योगामध्ये इंटर्नशीप करता येईल अशा प्रकारचा प्रस्ताव विद्यापीठाच्या विचाराधीन होता. याच या प्रस्तावाच्या संदर्भात अनेकांकडून वेगवेगळ्या सूचना विद्यापीठास प्राप्त झाल्या, त्यानुसार सदरचे प्रस्तावित वेळापत्रक २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांसाठी लागू न करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० पासून मात्र हा प्रस्ताव लागू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे.

Conclusion:अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी विद्यापीठ म्हणते, आता वेळापत्रक जुन्या पद्धतीने करू
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.