मुंबई - मुंबई विद्यापीठाकडून बीएससी आयटी सत्र 5 च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, परीक्षेचा निकाल 96. 73 टक्के लागला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीएससी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या हेत्या. आतापर्यंत मुंबई विद्यापीठाने 62 अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे.
8 हजार 453 विद्यार्थी उत्तीर्ण
कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. मुंबई विद्यापीठाची बीएससी आयटी सत्र 5 ची परीक्षा डिसेंबर 2020 मध्ये झाली होती. या परीक्षेत एकूण 8 हजार 453 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 9 हजार 640 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 9 हजार 612 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 28 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सोमवारी सात परीक्षांचे निकाल जाहीर
सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या आर्किटेक्चर चौथे वर्ष, एमएमएस सीबीएसजीएस सत्र 4, एमएमएस चॉईस बेस सत्र 4, एमएमएस चॉईस बेस सत्र 3, एमएमएस चॉईस बेस सत्र 4, एमएमएस डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट चॉईस बेस सत्र 3, बीई प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सत्र 7, चॉईस बेस व बीएससी आयटी सत्र 5 अशा 7 सात परीक्षांचे निकाल आज जाहीर करण्यात आला आहेत.