मुंबई - दहीहंडी उत्सव हा मुंबई आणि ठाणे शहरात मोठ्या Mumbai thane dahi handi expense प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, हा उत्सव आता सण परंपराच्या पलीकडे जाऊन dahi handi expense राजकीय पक्षांसाठी इव्हेंट ठरत आहे. दहीहंडीसाठी मुंबई ठाण्यात dahi handi expensive कोट्यवधींचा चुराडा करण्यात आला.
गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव मुंबईत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात यंदा साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडीवर कोरोनाचे निर्बंध होते. त्यामुळे उत्सव साजरा करता येत नव्हता यंदा हे निर्बंध हटवले गेल्यामुळे गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी या उत्सवाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा या उत्सवात यंदा भाजप आणि शिवसेना यांच्यात स्पर्धा रंगताना दिसली. त्यामुळे, या उत्सवावर लाखो रुपयांच्या बक्षिसांची आणि कोट्यवधीच्या खर्चाची खैरात झाली.
ठाण्यात लक्षावधीच्या दहीहंड्या - ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या वतीने दहीहंडीसाठी २१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तर, भारतीय जनता पक्षाने ठाण्यात 51 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली होती. तर या दोन्ही पक्षांच्या वरचे ठरत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने 55 लाख रुपयांचे बक्षीस दहीहंडीसाठी ठेवले होते. खासदार राजन विचारे हे सुद्धा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात. त्यांनी यंदा एक लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यामुळे, सर्व गोविंदा पथकांनी ठाण्यात गर्दी केली होती.
टेंभी नाका जांभळी नाका संघर्ष ठाण्यातील टेंभी नाक्यावर शिंदे समर्थकांनी हंडी बांधली होती, तर जांभळी नाक्यावर शिवसेनेच्या वतीने दहीहंडी बांधण्यात आली होती. टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या दहीहंडीला मोठा मान आहे. या ठिकाणी मुंबई आणि ठाण्यासाठी वेगवेगळ्या दोन हंड्या बांधण्यात आल्या होत्या. त्यांना प्रत्येकी दोन लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते.
थराप्रमाणे बक्षिसांची रक्कम याशिवाय गोविंदा पथकांनी सात थर लावल्यास त्यांना बारा हजार रुपये, सहा थर लावल्यास आठ हजार रुपये, पाच थरांसाठी सहा हजार आणि चार थरांसाठी पाच हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. याच पद्धतीने सर्व गोविंदा पथकांसाठी दहीहंडी आयोजकांनी बक्षिसांच्या रकमा ठेवल्या होत्या.
भाजपाचा मुंबईत बोलबाला भाजपने यंदा मुंबईत जांबोरी मैदान येथे भव्य दहीहंडीचे आयोजन करून शिवसेनेला धक्का दिला. तर मुंबईभरात 370 ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मुंबई, ठाण्यात पाचशेहून अधिक ठिकाणी दहीहांडीचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व मंडळांकडून बक्षिसांसाठी एकूण चार ते पाच कोटी रुपये खर्च झाला असावा, अशी माहिती सत्यम गोविंदा पथकाचे तानाजी केसरकर यांनी दिली.
आयोजनावरही लाखोंचा खर्च दहीहंडी आयोजकांकडून गोविंदा पथकांना देण्यात येणारे टी-शर्ट, गोविंदाचा विमा, शहरभर लावण्यात आलेले भव्य बॅनर्स आणि प्रत्यक्ष दहीहंडीच्या आयोजनावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे, यंदा दहीहंडीने मुंबईत कोट्यवधी रुपयांचे थर लावल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा Cocaine Smuggling 5 कोटी रुपयांच्या कोकेनसह विदेशी महिलेला मुंबई विमानतळावरुन अटक