मुंबई - वरळी येथे मंगळवारी झालेल्या सिलेंडर स्फोटातील ( Standing committee on Gas cylinder blast in worli ) घटनेचे स्थायी समितीच्या बैठकीत पडसाद उमटले आहेत. स्फोटातील जखमी बालकावर उपचार करण्यात हलगर्जीपणा ( Nayar hospital negligence case ) झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थायी समितीत करण्यात आली आहे.
वरळी बीडीडी चाळीत मंगळवारी सकाळी सिलेंडर स्फोट होऊन आग लागली. या आगीत एकाच कुटूंबातील चार जण जखमी झाले. त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर उपचार करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणी दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा निषेध करत आरोग्य समितीमधील भाजपच्या 11 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आजची स्थायी समिती तहकूब करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली होती. या विषयावर भाजपने मांडलेली सभा तहकुबी विचारात न घेता सत्ताधारी शिवसेनेकडून सभागृह नेत्या ( Shivsena Leader Vishakha raut on Nayar hospital negligence ) विशाखा राऊत यांनी तहकुबी मांडली. याला सर्वच पक्षीयांनी पाठिंबा दिल्याने सभा तहकूब करण्यात आली.
हेही वाचा-Worli Gas Cylinder Blast : वरळीतील गॅस सिलेंडर स्फोटात लहान बाळाचा मृत्यू
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा -
सभा तहकुबीवर बोलताना विशाखा राऊत म्हणाल्या, की पालिकेने कोविडमध्ये चांगले काम केले. यामुळे मुंबईचे नाव जगभरात गेले. मात्र नायरमधील एका घटनेने मान खाली घालायला लागली आहे. अशा घटना पुढे घडू नयेत, हलगर्जी पणा होऊ नये म्हणून कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.
आगीच्या घटनेत चार महिन्याचा मुलाचा ( kid death after Gas cylinder blast ) मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्व दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.
हेही वाचा-सिलिंडर स्फोटातील रुग्णांच्या उपचारांमध्ये दिरंगाई, खात्यांतर्गत चौकशीचे आदेश
सर्वच रुग्णालयाच्या अपघात विभागात हेच प्रकार अनुभवायला मिळतात. या विभागाचे पुन्हा नव्याने रिफॉर्म करण्याची गरज आहे. बर्न वॉर्ड आयसीयूमध्ये काय परिस्थिती आहे, हे पाहावे. घटनेतील दोषींवर एफआयआर दाखल व्हायला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली. पालिका अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबियांचे उपचार पालिका रुग्णालयात उपचार घेण्याची सक्ती करा, तरच पालिकेची रुग्णालये फाईव्ह स्टार बनतील, असे संजय घाडी यावेळी म्हणाले.
हेही वाचा-Gas Cylinder Explosion : वरळीत गॅस सिलेंडरचा स्फोट, चार जखमींपैकी दोन गंभीर
गुन्हा करायला मोकळे सोडू नका -
बालकाच्या मृत्यू प्रकरणी निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. या आधी ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्यांना नंतर पुन्हा कामावर घेण्यात आले. चूक करणाऱ्यांना आपली चूक कळावी म्हणून कठोर कारवाई करा. दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा. तसेच मृत बालकाच्या कुटूंबियांना २५ लाखांची आर्थिक मदत करा अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. तर या डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यासाठी मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करण्याची तसेच डॉक्टरांच्या कामाचे तास कमी करण्याची मागणी शिरसाट यांनी केली.
कठोरात कठोर कारवाई करा -
दोषी असलेले दोन डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित केले आहे. नायर रुग्णालयामधील उप अधिष्ठाता यांची समिती स्थापन केली आहे. थर्ड पार्टी चौकशी करण्यासाठी वैद्यकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. यात भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. ही समिती जो अहवाल देईल त्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी व संजीव कुमार यांनी दिली.
रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे ऐकत नाहीत. यामुळे त्यांना कसे वागावे, कसे बोलावे याचे प्रशिक्षण द्यावे. तसे फलक प्रत्येक रुग्णालयात लावावेत. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.