ETV Bharat / city

भाजप नेते किरीट सोमैय्या यांचे पुत्र नील सोमैय्या यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दणका; फेटाळला जामीन अर्ज

मुंबई- भाजप नेते किरीट सोमैय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) दणका दिला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन ( Neel Somaiya bail ) फेटाळला आहे.

नील सोमैय्या
नील सोमैय्या
author img

By

Published : Mar 1, 2022, 4:56 PM IST

Updated : Mar 1, 2022, 5:29 PM IST

मुंबई - भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांचे पुत्र भाजप नगरसेवक नील सोमैय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. किरीट सोमैय्या यांना मोठा दणका असल्याचे म्हटले जात आहे. न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

जमीन खरेदी प्रकरणात अटकेची भीती निर्माण झाल्याने भाजप नेते किरीट सोमैय्या यांचा मुलगा नील सोमैय्याने अटकपूर्व जामीनसाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाला होता. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज निकाल देत नील सोमैय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
हेही वाचा- Nawab Malik Case : उद्याच्या उद्या सुनावणी का व्हावी? उच्च न्यायालयाने नवाब मलिकांकडे मागितले स्पष्टीकरण

नील सोमैय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल

न्यायाधीश दीपक भागवत ( Judge Dipak Bhagwat ) यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. नील यांच्याविरोधात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. मात्र असे असले तरी त्यांच्याविरोधातील आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधीत कठोर कारवाई करण्याच्या 72 तास आधी नोटीस देण्यात द्यावी, अशी मागणी सोमैय्या यांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ अशोक मुंदरगी यांनी केली. राज्य सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले, की नील सोमैय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतेही आश्वासन देता येणार नाही, असे राज्य सरकारकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा-ED Summons Malik Son : नवाब मलिकांच्या मुलाने वेळ मागितल्याचे पत्र ईडीने नाकारले

बाजारभावापेक्षा कमी किंमतीत जमीन खरेदी-

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात दररोज नवनवे घोटाळ्यांचा बाहेर काढण्याचा सपाटाच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्यांनी सुरू केला होता. त्या विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बाप बेटे जेल जाएंगे असा नारा दिला होता. किरीट सोमैय्या यांच्या मुलाने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत जमीन खरेदी केल्याचा दावाही केला होता. हा व्यवहार नीलच्या मालकीच्या निकॉन इन्फ्राच्या माध्यमातून झाला असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर अन्य एका प्रकरणात नीलला पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यातही बोलाविले होते. त्यामुळे आपल्याविरोधात एफआयआर दाखल होण्याआधीच नीलने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
हेही वाचा-Ashish Shelar Mumbai : 'नवाब मलिक प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या दबावाखाली झुकू नये'

संजय राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले होते, की निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे? ही कंपनी किरीट सोमैयांची आहे. त्यांच्या कुटुंबियांशी आहे. त्यांचा मुलगा नील सोमैयांची आहे. तो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प त्यांनी मौजे गोखीवरे ता. वसई येथे उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमैयांनी ब्लॅकमेल केले. वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमीन घेतली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी सोमैयांवर केला होता.

Last Updated : Mar 1, 2022, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.