मुंबई : मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन, अचानक मागे घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा या 10 पैकी 9 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने पोलीस दलात तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या बदल्यांबाबतचे आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढले आहेत. बदली पोलिसांनी नेमणुकीच्या ठिकाणी हजर राहून तात्काळ कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात म्हटले आहे.
या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या..
1. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे सायबर आणि सायबरचे उपायुक्त विशाल ठाकूर यांची परिमंडळ-११ येथे बदली करण्यात आली आहे.
2. झोन-७ या विभागात कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त परमजितसिंग दहिया यांची बदली परिमंडळ-३ येथे करण्यात आली आहे.
3. सुरक्षा आणि संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याकडे परिमंडळ-७ ची जबाबदारी देण्यात आली आहे
4. विशेष शाखा-१ चे गणेश शिंदे हे बंदर परिमंडळचे कामकाज पाहतील.
5. शहाजी उमाप यांची विशेष शाखा-१ला बदली करण्यात आली आहे.
6. डॉ. मोहन दहीकर आधी परिमंडळ-११ला होते, आता एल ए ताडदेव येथे बदली करण्यात आली आहे.
7. विशाल ठाकूर सायबरला होते, आता झोन-११ येथे बदली.
8. प्रणय अशोक परिमंडळ-५ ला बदली.
9. नंदकुमार ठाकूर सीबी डिटेक्शन येथे बदली, आधी एल. ए. ताडदेव येथे होते.
दरम्यान, याआधी करण्यात आलेल्या बदल्या रद्द केल्यानंतर अनेक वाद निर्माण झाले होते. आज करण्यात आलेल्या बदल्यांबाबतही अजून कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
हेही वाचा : पोलिसांच्या अंतर्गत बदल्यावरुन महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद...