मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ ( Mumbai Corona Update ) होऊ लागली आहे. ८ जूनला १७६५ रुग्णांची नोंद झाली होती. आज ( ९ जून ) पुन्हा १७०२ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Records 1702 Cases As Corona ) आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी १७०० च्यावर रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली ( Mumbai Corona Death ) आहे. मुंबईत सध्या ७९९८ सक्रिय रुग्ण ( Mumbai Active Corona Cases ) आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
१७०२ नवे रुग्ण - मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १७ हजार ६४८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १७०२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. ७०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ७५ हजार २४३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४७ हजार ६७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७९९८ सक्रिय रुग्ण ( Mumbai Active Corona Cases ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७३३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातील कोरोना वाढीचा दर ०.०९३ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १७०२ रुग्णांपैकी १६२४ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ६०३ बेड्स असून, त्यापैकी ३२३ बेडवर रुग्ण आहेत.
रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, १७०२ रुग्णांची नोंद झाली आहे.
१०४ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा - Rajyasabha Election 2022 : राज्यसभेच्या निवडणुकासाठी मनसेची भाजपाला साथ