अंधेरी ( मुंबई ) - मुंबई पोलीसांनी साडेनऊ वर्षांपूर्वी अपहरण ( Mumbai police ) झालेल्या एका मुलीला शोधून तिच्या पालकांकडे सुपूर्द केले आहे. सात वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती ( seven year old girl missing ). पूजा गौड असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव आहे ( seven year old girl kidnap ). अपहरण केल्याप्रकरणी हॅरी डिसूझा आणि त्याची पत्नी सोनी डिसूझा यांना अटक केली आहे ( Mumbai police arrest accused ). 22 जानेवारी 2013 ला पूजा गौडचे अपहरण झाले होते.
पूजा शाळेत दाखल झालीच नाही - भाऊ रोहित याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून शाळेत जाताना पूजाचे अपहरण झाले असे सांगितले होते. आजोबांनी रोहीतला 10 रूपये दिले होते. जे दोघांमध्ये वाटून घ्यायचे होते. रोहितने त्यातले 5 रूपये तिला शाळेतल्या मध्यान्न भेजणावेळी देण्याचे सांगितले. सुट्टी दरम्यान ती शाळेजवळच्या कट्ट्यावर बसली होती. शाळेला उशीर होत असल्याने रोहितने तिला लवकर चालण्याचे सांगितले. आणि तो घाईघाईत शाळेच्या गेटच्या आत निघून आला. त्यानंतर पूजा शाळेत वेळेत दाखल झाली की नाही हे रोहितने पाहिले नाही.
आईस्क्रीमचे आमिष दाखवले - डीएन नगरचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरणकर्त्यांनी पूजाला आईस्क्रीम देण्याचे आमिष दाखवले होते. त्यावेळी डिसूझा दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. आणि त्यांनी पूजाला स्वत:जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तिचे नाव बदलून अॅनी ठेवले. तीन वर्षांनंतर त्यांना एक मूल झाले. त्यानंतर पूजाला त्रास देण्यास सुरूवात केली. तिला घरकाम करायला लावायचे. इतर ठिकाणी मोलकरीण म्हणून कामाला पाठवू लागले. तिला मारहाण करत तिच्याजवळचे पैसे काढून घेतले गेले.