मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेले अल्टिमेटमची मुदत आज संपणार संपुष्टात येत आहे. त्यामुळे मुंबईतील मनसे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी 2 मे ते 17 मे पर्यंत मुंबई सोडण्याचे नोटीस बजावली ( Mumbai Police Issues Notice) आहे.
कार्यकर्त्यांना नोटीस बजावली - औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी या सभेमध्ये 4 मे नंतर राज्यात मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून हिंदू संघटनेचे संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.
कार्यकर्त्यांना मुंबई सोडण्याचे आदेश - दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. ही मुदत संपूनही अद्याप कोणत्याही मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या इशाऱ्याप्रमाणे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये असंतोष - मुंबईतील कायदा आणि सुवव्यस्था बिघडू नये यासाठी मनसे तसेच इतर धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी नोटिसा धाडल्या आहेत. सार्वजनिक शांतता बाधित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने 2 मे ते 17 मे या कालावधीत मुंबईत वास्तव्यास राहू नये असे काही कार्यकर्त्यांना नोटिशीमधून बजावण्यात आले आहे. मात्र 15 दिवस मुंबई सोडण्याची नोटीस दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे.
शहरात जमावबंदीचे आदेश - घाटकोपर पोलिसांकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले होते. ACP आनंद नेर्लेकर यांनी यासंबंधीचे आदेश दिले. संपूर्ण मुंबईभर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 आणि 188 लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच शहरात जमावबंदी आणि सरकारी आदेश लागू करण्यात आले आहेत.
गृहमंत्र्याच्या उच्च अधिकाऱ्यांसह बैठक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या मशिदीवरील भोंगे संदर्भात दिलेल्या अल्टिमेटम नंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भातील आढावा घेण्याकरीता आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमीटर संदर्भात काय उपाय योजना करण्यात यावा तसेच कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे बाधित राखावी या करिता चर्चा होणार आहे. या बैठकीत महासंचालक तसेच सर्व पोलीस आयुक्त व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीस उपस्थित राहणार आहेत.