ETV Bharat / city

MD Drug Seized In Palghar : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे 1400 कोटीचे ड्रग्ज जप्त; पोलिसांची मोठी कारवाई - Mumbai Police raid

मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका ड्रग्ज उत्पादन युनिटवर छापा टाकून 1400 कोटी रुपयांचे 700 किलो पेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त ( Mephedrone drug seized ) केले आहे. या संदर्भात पाच जणांना अटक केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

MD Drug Seized In Palghar
पालघरमध्ये एमडी ड्रग जप्त
author img

By

Published : Aug 4, 2022, 5:03 PM IST

मुंबई - मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने ( Anti-drug cells ) एका युनिटवर छापा टाकून 1400 कोटी रुपयांचे मेफेड्रोन केले जप्त आहे. पोलिसांनी 1 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे एमडी ड्रग्स अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त ( Mephedrone drug seized ) केलं आहे. मुंबई बाहेर सुरू असणाऱ्या एका ड्रग्स फॅक्टरीवर कारवाई करत जवळपास 700 किलो एमडी ड्रग्स अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले आहे. या प्रकरणात एकूण 5 आरोपीना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या पाच आरोपीची चौकशी पोलिस करीत आहेत.

पालघरमध्ये एमडी ड्रग जप्त

चार आरोपींना मुंबईतून अटक - विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एएनसीच्या पथकाने या परिसरावर छापा टाकला त्यादरम्यान तेथे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन तयार केल्याचे समोर आले. चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर, नालासोपारा येथे एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. असे, अधिकाऱ्याने सांगितले. शहर पोलिसांनी अलीकडच्या काळात पकडलेली ही सर्वात मोठी अंमली पदार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. मेफेड्रोनला म्याव म्याऊ किंवा एमडी असेही म्हणतात. नॅशनल नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्यानुसार ( National Narcotic Drugs and Psychotropic Substances Act ) त्यावर बंदी आहे.

गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान - या आगोदर मुंबई पोलिसांनी अशा अनेक कारवाया केल्या आहेत. तरीही अशा पद्धतीची गुन्हेगारी वाढत आहे. काल झालेल्या केलेल्या कारवाईमध्ये 1 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच एमडी ड्रग्स अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलं जप्त केलं. ही कारवाई एका ड्रग्स फॅक्टरीवर करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांचं नेहमीप्रमाणे कौतुक होतं आहे. शहरातील गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्यावरती आहे. ज्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांची कसून चौकशी होणार आहे.

हेही वाचा - Terrorist Planned To Attack : लष्कर- ए- तोयबासह खलिस्तानी दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत.. दिल्लीत हायअलर्ट..

वैद्यकीय चाचणी करणार - ताब्यात घेतलेल्या पाच लोकांची पोलिस वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही फॅक्टरी कोण चालवतो. फॅक्टरीचा मालक कोण आहे. तिथं किती कर्मचारी काम करतात याची सगळी चौकशी होण्याची शक्यता आहे. यातील चार आरोपींना मुंबईत अटक करण्यात आली आहे. तर एका व्यक्तीला नालासोपारा येथे अटक करण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. अलिकडच्या काळात शहर पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी अमली पदार्थांची कारवाई आहे असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Sanjay Raut ED Custody : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.