मुंबई : 'बुली बाई' अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो ( Muslim Women Offensive Content ) अपलोड करुन त्यात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली ( Priyanka Chaturvedi FIR Against Bulli Bai App ) आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सायबर सेलकडे ( Mumbai Cyber Cell ) देखील त्यांनी तक्रार केली आहे. चुकीच्या पद्धतीने महिलांच्या फोटोंचा वापर केला जात असल्याचा आरोप चतुर्वेदी यांनी केला आहे.
केंद्राकडे तक्रार, पण दखल नाही
याचसंदर्भात केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव ( IT Minister Ashwini Vaishnav ) यांच्याकडे मी स्वतः तक्रार केली. मात्र त्यांच्याकडून याची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप देखील प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे. या अॅपवर प्रसिद्ध करण्यात आलेले फोटो दिल्लीतल्या एका महिलेने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
शिवसेना नेहमीच महिलांच्या समर्थनार्थ
महिलांच्या परवानगिशिवाय त्यांचे फोटो प्रसिद्ध कसे केले जातात. याचा खुलासा करणे गरजेचे आहे. महिलांच्या विरोधात कोणाही काही बोलले तर त्याविरोधात शिवसेना कायमच महिलांच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे.
या अॅपवर होतो मुलींचा लिलाव : नवाब मलिक
गीट हब आणि सॉली डील या अॅप्सद्वारे अल्पसंख्याक महिलांची बदनामी केली जात आहे. महिलांचे फोटो टाकत त्यात अश्लिल मजकुर लिहला जात आहे. त्यामुळे हे अॅप्स, पोर्टल चालवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. या पोर्टलवर मुलींचा लिलाव केला जात असून, मी स्वत: गृहमंत्र्याकडे यासंबंधी तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक म्हणाले.