मुंबई - जीवावर बेतणारा स्टंट करणे मुंबईमधील तरुणाला महागात पडले आहे. कांदिवली परिसरात 23 मजल्याच्या इमारतीवरून जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टंटचा व्हिडिओ हा अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील पश्चिम विभागात असलेल्या एका 23 मजल्याच्या इमारतीवर तरुण त्याच्या हातांवर उभा राहिल्याचे स्टंटमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ चित्रीकरणात जर या तरुणाचा तोल गेला असता तर त्याच्या जीवावर हे प्रकरण बेतले असते. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तरुणाची व चित्रीकरण करणाऱ्या 2 तरुणांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या संदर्भात संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.