ETV Bharat / city

मरीन ड्राईव्ह खंडणी प्रकरण : परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करा, मुंबई पोलिसांची न्यायालयात मागणी - non-bailable warrant against Paramveer Singh

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणामध्ये परमवीर सिंग यांचा मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद आहे. मुंबई पोलिसांकडून महानगर दंडाधिकारी न्यायालयात परमबीर सिंह यांच्या विरोधात नाँन बेलेबल वारंट काढण्याबाबत वकिलांचे न्यायालयात पत्र दिले आहे. महानगर न्यायालय यावर उद्या निर्णय देणार आहे.

non-bailable warrant against Paramveer Singh

author img

By

Published : Nov 9, 2021, 7:45 PM IST

Updated : Nov 9, 2021, 7:56 PM IST

मुंबई - मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणामध्ये परमवीर सिंग यांचा मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद आहे. मुंबई पोलिसांकडून महानगर दंडाधिकारी न्यायालयात परमबीर सिंह यांच्या विरोधात नाँन बेलेबल वारंट काढण्याबाबत वकिलांचे न्यायालयात पत्र दिले आहे. महानगर न्यायालय यावर उद्या निर्णय देणार आहे. आतापर्यंत 2 नाँन बेलेबल वाँरंट परमवीर सिंग यांच्या विरोधात ठाणे आणि गोरेगाव या प्रकरणात काढण्यात आले आहे.

मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात श्याम सुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ही अटक करण्यात आली आहे. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना महाराष्ट्र केंद्रीय गुप्तचर संस्था सीआयडीने अटकेची कारवाई केले आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसाची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करा
काय आहे प्रकरण?
गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष ९ मध्ये होते. श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता त्यानंतर तेच प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. ठाण्यातील बिल्डर अग्रवाल याने दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त अकबर पठाण सह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरकेसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता याप्रकरणात पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक केली आहे.
परमबीर सिंग यांच्यावर दोन नाँन बेलेबल वाँरट -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या विरोधात मुंबईत अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेकदा समन्स पाठवून सुद्धा हजर न राहिल्याने ठाणे नगर पोलिस, गोरेगाव खंडणी प्रकरणात वारंट जारी करण्यात आले आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी देखील आता न्यायालयात परमवीर सिंग यांच्या विरोधात नाँन बेलेबल वाँरट न्यायालयात काढण्याची विनंती केली आहे.

Last Updated : Nov 9, 2021, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.