ETV Bharat / city

Sanjay Pandey Warns Delivery Boys : ...अन्यथा डिलिव्हरी बॉयसह कंपनीवरही कारवाई, आयुक्त संजय पांडेंचा इशारा - संजय पांडे डिलिव्हरी बॉय कारवाई

डिलिव्हरी बॉयकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे यापुढे वाहतुकीचे नियम मोडल्यास अथवा विरुद्ध दिशेने गाडी चालवल्यास डिलिव्हरी बॉयवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त पांडे यांनी दिला ( Sanjay Pandey Warns Delivery Boys ) आहे.

Sanjay Pandey
Sanjay Pandey
author img

By

Published : Mar 14, 2022, 3:36 PM IST

मुंबई - ग्राहकांना झटपट खाद्यपदार्थ पोहचवण्यासाठी कंपन्यांची चढाओढ असते. यातून डिलिव्हरी बॉयकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याच पार्श्वभुमीवर डिलिव्हरी बॉयना नियुक्त करताना त्यांची चारित्र्य पडताळणी ( Character certification delivery boys Mumbai CP ) करावी. तसेच, त्यांना योग्य प्रशिक्षण आणि गणवेश देण्यात यावा, असे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai CP Sanjay Pandey ) यांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला ( Sanjay Pandey Warns Delivery Boys ) आहे.

...अन्यथा डिलिव्हरी बॉयसह कंपनीवर कारवाई

अनेकदा लूटमारीच्या घटना घडल्यामुळे डिलिव्हरी बॉय आणि संबंधित कंपन्यांना शिस्त लावण्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे मैदानात उतरले आहेत. रविवारी संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना त्यांनी मुंबईच्या अनेक मुद्द्यांवरून भाष्य केले आहे. यामध्ये वाहतूक ध्वनिप्रदूषण तसेच बेशिस्तपणे गाडी चालवणारे डिलिव्हरी बॉय संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. पांडे म्हणाले की, 'माझ्याकडे अनेक नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या तक्रारी केल्या आहेत. यापुढे डिलिव्हरी बॉयने वाहतुकीचे नियम मोडले अथवा विरुद्ध दिशेने गाडी चालवताना आढळल्यास डिलिव्हरी बॉयसह ते काम करत असलेल्या संबंधित कंपनीवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.'

'या'बाबात कंपनीने दक्षता घ्यावी

तसेच, 'या डिलिव्हरी बॉय संबंधित नियमावलीही जारी करण्यात आली आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉयची नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यांना सेवा पुरवण्यासंदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे. त्यांच्या कामाबाबतचे करारपत्र व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करून घेणे गरजेचे राहणार आहे. अनेकदा डिलिव्हरी बॉय क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे आकाराचे सामान घेऊन दुचाकी चालवतात. याबाबतही कंपनी चालकाने दक्षता घ्यावी अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांना व्यवस्थित गणवेश परिधान करण्यास सूचना द्याव्या, असे आदेशही पांडे यांनी दिले आहेत.

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी येणारे नागरिक हे मोठ्या अपेक्षेने येत असतात. त्यांच्याशी पाहुण्यासारखे वागा. तुम्ही नागरिकांशी बोलताना कठोर भाषा वापरली तर पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लागेल. ज्येष्ठ नागरिक पोलीस ठाण्यात आले तर त्यांना आधी प्यायला पाणी द्या त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. तक्रारदार गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला समान वागणूक द्या. आपल्या अधिकाऱ्यांनी बेकायदा लॉटरी आणि डान्स बारवर कारवाई केली पाहिजे. पण, स्वत:च्या प्रतिमेवर डाग लागू देता कामा नये, अशा सूचनाही आयुक्त पांडे यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा - Home Minister About Fadnavis Interrogation : 'देवेंद्र फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली' - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.