ETV Bharat / city

सायबर गुन्ह्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्या, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे मुंबईकरांना आवाहन

सध्या सायबर क्राईमचे गुन्हे समोर येत आहेत. त्यासाठी एखाद्याला खोटा फोन आला किंवा पैसे अकाउंटमधून कमी झाल्याचा संदेश आला असल्यास त्यांनी त्वरित मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम ( Mumbai Police Commissioner Hemant Nagrale on Cyber crime ) विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे.

Mumbai Police Commissioner Hemant Nagrale
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे
author img

By

Published : Feb 15, 2022, 4:44 PM IST

मुंबई - सध्या सायबर क्राईमचे गुन्हे समोर येत आहेत. त्यासाठी एखाद्याला खोटा फोन आला किंवा पैसे अकाउंटमधून कमी झाल्याचा संदेश आला असल्यास त्यांनी त्वरित मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम ( Mumbai Police Commissioner Hemant Nagrale on Cyber crime ) विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे. अशी माहिती त्वरित दिल्यास दोषींना पकडणे शक्य असल्याचे नगराळे यांनी सांगितले. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती वेळेवर दिल्याने नागरिकांचे ६ कोटी रुपये आम्ही वाचवू शकलो, असे नगराळे यांनी सांगितले.

हेही वाचा - Yes Bank case : सीबीआयची मुंबईसह पुण्यात छापेमारी

एक तास गोल्डन हावर -

मुंबई पोलिसांच्या २०२१ या वर्षाचा वार्षिक अहवालाचे अनावरण पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना नागराळे यांनी हे आवाहन केले आहे. एखादा सायबर गुन्हा घडला, एखाद्याचे अकाउंटमधील पैसे कोणी काढून घेतल्यास एक तास हा गोल्डन हावर असतो. या एका तासात पैसे संबंधित गुन्हा करणाऱ्याच्या अकाउंटमध्ये असतात. त्याचवेळी तक्रार आल्यास बँकाही सहकार्य करून ते पैसे इतर अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करू देत नाहीत. यामुळे दोषींवर कारवाई करणे शक्य होते. यासाठी असे गुन्हे झाल्यास नागरिकांनी त्वरित सायबर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नगराळे यांनी केले.

लवकरच पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही -

पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावण्यास सांगितले आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी टेंडर काढले आहे. हे टेंडर अंतिम टप्प्यात आहे. काही पोलीस ठाण्यात खासगी सहभागाने सीसीटीव्ही लावले आहेत. मुंबईत महत्वाच्या रस्त्यांवर 5 हजार 380 सीसीटीव्ही लावले आहेत. त्यामुळे, गुन्ह्याचा शोध घेण्यात त्याचा उपयोग होत आहे. मुंबईत केबल टाकण्याचे काम सुरू असून आणखी 5 हजार 530 सीसीटीव्ही लवकरच लावू, असेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

गॅंगस्टरबाबात तक्रारींची दखल -

दाऊदबाबत सीबीआय तपास करत आहे. इडीने दाऊदच्या काही निकटवर्ती आणि हस्तकांची मालमत्ता सिल केली आहे. मुंबई पोलीस यावर लक्ष ठेवून आहे. गँगस्टरबाबत कोणतीही तक्रार आल्यावर गुन्हा नोंद करून कारवाई केली जाते. मुंबईत नोंद झालेल्या केसेसमध्ये या तक्रारींचीही नोंद आहे, असे नागराळे म्हणाले.

मुंबईमधील विकास कामांमुळे ट्राफिक -

मुंबईत काल राजकीय आंदोलन झाले. यामुळे ट्राफिक जाम झाले. राजकीय आंदोलनामुळे ट्राफिक होते का यावर बोलताना, मुंबईमध्ये जास्त वाहने असल्याने ट्राफिक जाम होते. शहरात रोड, पूल आणि मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर ताण येणे साहजिक आहे. नागरिकांना त्रास होत आहे याची जाणीव आहे. लोक जास्त रस्त्यावर आल्यावर गर्दी होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामधून आम्ही मार्ग काढत आहोत. मात्र, कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होते, असे नगराळे म्हणाले.

महिला घराबाहेर न आल्याने गुन्हे कमी -

२०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने कर्फ्यू लागू होता. यामुळे महिला घराबाहेर आल्या नाहीत. यामुळे केसेस कमी झाल्या. याला आणखीही कारणे असू शकतात, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. महिला व बालकांच्याबाबत गुन्हा दाखल केल्यावर महिला अधिकाऱ्यांकडे तपास दिला जातो. अशा केसेसकडे विशेष लक्ष दिले जाते. वरिष्ठ अधिकारी याचा रोज आढावा घेतात. असे गुन्हे करणाऱ्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड बनवले आहेत. अशा लोकांना तडीपार केले जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्भया सहायता केंद्र सुरू केले जात आहे. पीडितांचे काऊन्सिलिंग केले जाणार आहे. स्लम, लेडीज हॉस्टेल ज्या ठिकाणी महिला अधिक प्रमाणात असतात ती ठिकाणे मॅपिंग केली आहेत. निर्भया पथकाकडून त्या ठिकाणी जाऊन पेट्रोलिंग केले जात आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

आर्थिक गुन्ह्यातील ४० कोटी मिळवून दिले -

आर्थिक गुन्ह्यांमध्ये गुन्ह्याचा शोध लावणे, आरोपीला शोधणे, ज्याचे नुकसान झाले त्याला त्याची रक्कम कशी मिळेल यासाठी आरोपीकडे बँकेत किती रक्कम आहे, प्रॉपर्टी किती त्याचा आढावा घेतला जातो. त्याची माहिती घेऊन आरोपीला अटक केली जाते. तक्रारदाराला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. 2021 मध्ये पीडितांना 40 कोटी रुपये मिळवून देण्यात पोलिसांना यश आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा - Shivsena Press : 'झुकेंगे नही' शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी; पत्रकार परिषदेसाठी LED स्क्रीनची व्यवस्था

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.