मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीबीआयची टीम मुंबईत तपासासाठी येणार आहे. मुंबई महापालिकेने अगोदरच जे अधिकारी येणार आहेत, त्यांनी महापालिकेला कळवणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. यावरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी महापालिका अधिकारी आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी, सीबीआयचे अधिकारी मुंबईत तपासासाठी येतील तेव्हा यावेळी मुंबई पोलीस कमिशनर आणि महापालिका आयुक्त हे मुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव असल्यासारखे वागणार नाहीत, अशी अपेक्षा करतो. तसेच सीबीआयला तपासात सहकार्य करा, असे म्हटले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या उर्जामंत्र्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहेत. पाटण्याचे एसपी विनय तिवारी हे या अगोदर मुंबईत तपासासाठी आले होते. तेव्हा त्यांना महापालिकेने क्वारंटाईन केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधीच सरकारी अधिकाऱ्यांनी महापालिकेला कळवून याे, अन्यथा क्वारंटाईन करू असे सांगितले आहे. त्यामुळे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर टीका करत सीबीआय अधिकाऱ्यांना सहकार्य करा, असे म्हटले आहे.