ETV Bharat / city

मरीन ड्राईव्ह चौपाटीवर 15 दिवसांच्या बाळाला सोडून जाणारे दोघे अटकेत - Marine Drive area of Mumbai

मरिन ड्राईव्ह चौपटीजवळच्या एका बस स्टॉपच्या आडोशाला 15 दिवसांच्या बाळाला सोडून जाणाऱ्या मातेला आणि तिच्या भावाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी चर्चगेट ते खडवली रेल्वे स्थानकावरील तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेज तपासून ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र पोलीस
author img

By

Published : May 19, 2022, 6:48 PM IST

मुंबई - मरिन ड्राईव्ह चौपटीजवळच्या एका बस स्टॉपच्या आडोशाला 15 दिवसांच्या बाळाला सोडून जाणाऱ्या मातेला आणि तिच्या भावाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी चर्चगेट ते खडवली रेल्वे स्थानकावरील तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेज तपासून ही कारवाई केली आहे. सरोज सत्यनारायण सहारण आणि रामसेवक प्रेमलाल यादव, अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबात पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील सरोजचे विवाह राजस्थानमधील तिच्या दुप्पट वयाच्या एका व्यक्तीबरोबर झाला होता. गेल्या रक्षाबंधनावेळी सरोजचा भाऊ रामसेवक हा तिला भेटायला राजस्थानला गेला होता. मात्र, त्यावेळी मला येथे राहायचे नाही, मुंबईत घेऊन चल म्हणून सरोजने त्याच्याकडे आग्रह धरला. ती मुंबईला परत आली. त्यानंतर तिने आपण परत जाणार नाही, असा निर्णय घेतला.

श्रीमंत लोक घेऊन जातील म्हणून ठेवले बाळाला - दरम्यान, ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. तिने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशीर झाला होऊन अखेर तिने एका बाळाला जन्म दिला. पतीला आधीच सोडल्यामुळे तिने बाळाला आपल्याजवळ न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ती त्या बाळाला या ठिकाणी सोडून निघून गेली. विशेष म्हणजे यावेळी तिचा असा विचार होता की या भागात श्रीमंत लोक येथे सतत येत असल्याने ते या बाळाला घेऊन जातील. मात्र, त्याआधीच गेल्या 6 मे रोजी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौपाटीजवळच्या बस स्टॉपच्या आडोशाला कोणीतरी अज्ञाताने हे नवजात बाळ ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

बाळ रुग्णालयात - पोलीस उपनिरीक्षक मनिषा ढेकळे यांनी पोलीस पथकासह जाऊन बालकाला ताब्यात घेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर या बाळावर औषधोपचार करुन त्याला बाल कल्याण समितीच्या आशा सदनमध्ये ठेवण्यात आले. आता ते सध्या बाळ जसलोक रुग्णालयात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

असा घेतला शोध - घटनास्थळाचे तसेच परिसरातील इमारतींचे सीसीटीव्ही फुटेज मिळवत त्या बालकाला ज्याने ठेवले याचा शोध सुरू केला. बालकाला तेथे ठेवणाऱ्या महिला आणि पुरुष हे चर्चगेट रेल्वे स्थानकावरून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. तर बालकाला ठेवून गेल्यानंतर ते मरिन लाईन्स रेल्वे स्थानकात गेल्याचे दिसले. त्यामुळे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे चर्चगेटवरुन दादरला उतरले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये बसल्याचे दिसून आले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने चर्चगेट रेल्वे स्टेशन तसेच त्यानंतर मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी प्रभादेवी, लोअर परेल, दादर, दादर सेंट्रल, माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, नाहूर, मुलुंड, ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, शहाड, अंबिवली, टिटवाळा, खडवली या रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहून आरोपींचा शोध घेतला. ते शेवटी खडवली रेल्वे स्थानकात उतरले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत दोघांच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा - Cleaning Orders To Ministry Staff : मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी साफसफाईचे आदेश, 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.