ETV Bharat / city

Suspicious Call To Mumbai Police पाकिस्तानातील नंबरवरून धमकीप्रकरण; मुंबई पोलिसांनी एका संशयिताला विरार येथून घेतले ताब्यात - Mumbai Police arrested a suspect from Virar

जी मुबारक हो, मुंबई मे हमला होने वाला है २६/११ की नई ताजी याद दिलाएगा असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी दि. 19 ऑगस्ट रोजी रात्री आला आहे. Mumbai Police त्यामुळे सर्व मुंबईतील पोलीस ठाणे आणि तपास यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी रात्रभर कारवाई सुरु आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Aug 20, 2022, 5:23 PM IST

मुंबई - मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईतील सुरक्षा वाढवली आहे. पाकिस्तानातील नंबरवरून काल रात्री ११. ४५ वाजता वाहतूक नियंत्रण कक्षास धमकीचा मेसेज आला. त्यानंतर याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ५०६(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. Suspicious Call To Mumbai Police आता मुंबई पोलिसांनी विरार येथून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु केली आहे. संबंधित व्यक्ती उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

नंबर यूपी एटीएसचा मात्र, धमकी देणाऱ्याने WhatsAppवर एकूण सात क्रमांक देखील वाहतूक नियंत्रण कक्षास शेअर केले आहेत. त्यापैकी एक नंबर हा उत्तर प्रदेश एटीएसचा असल्याचे निदर्शनास आले आहे. ईटीव्ही भारतने ९४५४४००६५० या क्रमांकावर संपर्क साधला असता हा क्रमांक उत्तर प्रदेश एटीएसचा असल्याचे निदर्शनास आले आहे. या नंबरवरील व्यक्तीने हा नंबर यूपी एटीएसचा असून इंटरनेटवर हा नंबर उपलब्ध असल्याचे सांगितले.

संशयितांची माहिती गोळा केली जात आहे हा नंबर एटीएस अधिकाऱ्याचा असून त्याने नाव सांगण्यास नकार दिला. Mumbai Police arrested a suspect from Virar तसेच पुढे त्याने माहिती दिली की, नुकतेच स्वातंत्र्य दिनापूर्वी पकडलेल्या तीन दहशतवाद्यांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्याची प्रक्रिया दहशतवाद विरोधी पथकाने ATS सुरू केली आहे. सुरुवातीला तिघांची स्वतंत्रपणे चौकशी करून त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर संशयितांची माहिती गोळा केली जात आहे.

हेही वाचा - एखाद दिवशी गडकरींचीही सीबीआय चौकशी होते की काय; काँग्रेस नेते कन्ह्यया कुमारांचे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.