मुंबई - निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निकटवर्तीय समजले जाणाऱ्या व्यक्तीला अपहरण आणि मारहाण केल्या प्रकरणात आज गुरुवार (दि. 14 जुलै)रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने अटक केली आहे. ( Sachin Waze Close Associate ) राजेश राजू शेट्टीयार (वय 41 वर्ष) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मुंबई क्राईम इंटेलिजन्स युनिटने सापळा रचून आरोपी राजेश राजू शेट्टीयार याला विक्रोळी पूर्व उपनगरातून अटक केली आहे. क्राईम इंटेलिजन्स युनिटने आता या प्रकरणात तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 पथकाकडे वर्ग केला आहे.
8 मे रोजी शेट्टीयार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण केले होते त्याला शिवडी भागात नेले जिथे त्यांनी त्याला मारहाण केली होती. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवत अटक केली आहे.
हेही वाचा - Shiv Sena: शिवसेनेला पुन्हा महाविकास आघाडी शक्य? वाचा, काय आहे विश्लेषकांचे मत