मुंबई - कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केले जात आहेत. राज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्ट पर्यंत वाढवला गेला आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू नये म्हणून तोंडाला मास्क लावणे हे आवश्यक असून तसा शासनाचा नियम सुद्धा आहे. तरीही बरेच जण हे रस्त्यावर जाताना तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या 6,115 जणांवर कारवाई केली आहे.
20 मार्च ते 24 ऑगस्ट या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्याच्या 20833 प्रकरणात तब्बल 48,599 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 8,163 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 18964 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे , तर 21,472 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.
लॉकडाऊन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1,906 गुन्हे दाखल करण्यात आले असून, मध्य मुंबईत 2,634 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . तर पूर्व मुंबई तब्बल 3,334 गुन्हे दाखल झाले आहेत. तर पश्चिम मुंबईत 3,483 उत्तर मुंबईत 9,476 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.
मुंबईत मास्क न वापरणाऱ्या 6,115 जणांवर मुंबई पोलिसांची कारवाई - mumbai police action
20 मार्च ते 24 ऑगस्ट या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्याच्या 20,833 प्रकरणात तब्बल 48,599 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 8163 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 18964 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे , तर 21,472 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.