मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आलेली आहे. दर दिवशी कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई पोलिसांकडून कलम 188 चे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे.
59 हजार 525 जणांवर गुन्हे दाखल
मुंबई पोलिसांनी 20 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2021 या कालखंडात एकूण 59 हजार 525 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात 9 हजार 136 आरोपी फरार असून तब्बल 23 हजार 232 आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आलेले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 27 हजार 157 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यांना जामिनावर सोडण्यात आलेले आहे.
सर्वाधिक गुन्हे उत्तर मुंबईत दाखल
20 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2021 या काळात दक्षिण मुंबईत एकूण 6 हजार 561 गुन्हे कलम 188 नुसार नोंदवण्यात आले आहेत. तर मध्य मुंबईत 2 हजा 936, पूर्व मुंबईत 3 हजा 794, पश्चिम मुंबईत 3 हजार 948 तर उत्तर मुंबईत सर्वाधिक 10 हजार 833 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये कोरोना रुग्ण संदर्भात हॉटेल अस्थापने अधिक वेळ सुरू ठेवणे, पानटपरी, इतर दुकाने, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, अवैध वाहतूक व मास्क न वापरल्याबद्दलचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.