ETV Bharat / city

Mumbai Crime Branch : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त - मुंबई पोलीस मराठी बातमी

मुंबई पोलिसांनी 16 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. 3 जणांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली ( Mumbai Police Arrested 3 With Drug ) आहे. त्यांच्याकडे 16 किलो 100 ग्रॅम वजनाचे ड्रग्ज ( Mumbai Police 16 Crore Drug Worth ) मिळाले.

Crime
Crime
author img

By

Published : Jan 13, 2022, 10:52 PM IST

मुंबई - मुंबई पोलीस क्राइम ब्रँचच्या युनिट एकने ( Mumbai Police Crime Branch ) ॲण्टॉप हिल परिसरातून 16 कोटी रुपयांच्या मेथॅक्युलॉनचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. याप्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली ( Mumbai Police Arrested 3 With Drug ) असून, त्यांच्याकडून 16 किलो 100 ग्रॅम वजनाचे ड्रग्ज ( Mumbai Police 16 Crore Drug Worth ) जप्त केले आहे.

बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ॲण्टॉप हिल भागात तीन तरुण आले होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या बॅगेत 16 किलो शंभर ग्रॅम वजनाचे मेथॅक्युलॉन नावाचे ड्रग्ज आढळून आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 16 कोटी 10 लाख रुपये आहे.

पोलिसांनी याप्रकरणी इम्रान इक्बाल जालोरी, अमजद हमीद खान, आसिफ अली मोहम्मद अरब यांना अटक करुन त्यांच्यावर एनडीपीएस कलमांतर्गत ( Narcotic Drugs and Psychotropic Substances ) गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना गुरुवारी लोकल कोर्टात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी हे ड्रग्ज कोठून आणले त्यांनी यापूर्वीही या ड्रग्जची विक्री केली आहे का त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा मुंबई पोलीस तपास करत आहे.

हेही वाचा - Santosh Parab Attack Case : नितेश राणे यांच्या जामिनावर 17 जानेवारी मुंबई उच्च न्यायालय देणार निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.