ETV Bharat / city

Salim Fruit : छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला 'या' तारखेपर्यंत एनआयए कोठडी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूटला गुरुवारी एनआयएने अटक केली होती. त्याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने 17 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली ( special court sends salim fruit nia custody ) आहे.

Salim Fruit etv network
Salim Fruit etv network
author img

By

Published : Aug 5, 2022, 7:57 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूटला गुरुवारी एनआयएने अटक केली होती. त्यानंतर आज ( 5 ऑगस्ट ) सलीम फ्रुटला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयासमोर हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने त्याला 17 ऑगस्ट पर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. लीमवर बिल्डरांकडून जबरदस्तीने फ्लॅट विकून पैसे दाऊदला दिल्याचा आरोप ( special court sends salim fruit nia custody ) आहे.

सलीम फ्रूट डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणं, तस्करी, नार्को टेररिझम, मनी लाँड्रिंग, मालमत्ताचे बेकायदेशीर व्यवहार करत असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. छोटा शकील आणि डी कंपनीच्या नावावर मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्यात सक्रिय भूमिका बजावल्याचा सलीम फ्रूटवर आरोप आहे.

यावर्षी मे महिन्यात एनआयए कडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांविरुद्ध मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात २० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. तेव्हा सलीम फ्रूट याच्या घरात छापेमारी करण्यात आली होती. तसेच, सलीम फ्रूटची चौकशी करण्यात आली होती. आरोपी सलीम फ्रूटला अटक करण्यात आली असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए या प्रकरणात पुढील तपास करत आहे. मे महिन्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर मुंबई आणि ठाण्यात 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. तेव्हा देखील ताब्यात घेण्यात आले होते. या झडतीमध्ये केंद्रीय एजन्सीने अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

तेव्हा एनआयएने दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि यांच्या जवळच्या साथीदारांविरुद्धही एफआयआर दाखल केली होती. एफआयआरनुसार पाकिस्तानातून दाऊद इब्राहिमने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी एक विशेष युनिट तयार केले होते. या युनिटचे काम भारतातील राजकीय नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करणे हे होते. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांनी पाकिस्तानातून भारतात दंगली भडकवण्याचा कट रचला होता, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा - Kedar Dighe : केदार दिघेंच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांचे 'त्या' प्रकरणी समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.