मुंबई - राज्यात सोमवारी गणेश चतुर्थी निमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशाची स्थापना करण्यात आली. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लखमंदल खुराना यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे सोमवारी दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
हेही वाचा... भाजप-सेनेच्या कार्यकाळामध्ये राज्यावर फक्त नैराश्याची छाया पसरली - अशोक चव्हाण
भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, अशी भूमिका सोलापूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी मांडली. त्यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... राजकारणात प्रवेश केल्यास प्रश्न विचारायचे स्वातंत्र्य गमावून बसेन - नाना पाटेकर
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला येथे रामदास आठवले यांनी आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लखमंदल खुराना यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, यावेळी आठवले यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री नावाला पाठींबा असल्याचे म्हटले.
हेही वाचा... आम्ही जिथे उभे राहू तेथून जिंकून येऊ - नारायण राणे
महायुतीचे मुख्यमंत्री फडणवीस असतील... - आठवले
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू आहे, ती पूर्ण करण्यासाठी महायुतीच सरकार येणे गरजेचं आहे, असे आठवले म्हणाले. अमित शाह यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे, त्याला माझा पाठींबा असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... महाराष्ट्रावरील संकट दूर होऊ दे, अमृता फडणवीस यांची बाप्पाकडे प्रार्थना
जागा वाटपाची अधिकृत घोषणा गणेश विसर्जनानंतर ?
गणेश विसर्जनानंतर जागा वाटपाची अधिकृत घोषणा होईल, असे आठवले यावेळी म्हणाले. 12 तारखेनंतर कोणाला किती जागा देण्यात येईल याची अधिकृत घोषणा होईल. भाजप शिवसेनेला समान 135 - 135 जागा व रिपब्लिकन पार्टीला 10 व इतर मित्र पक्षांना 8 जागा देण्यात याव्यात, अशी भूमिका आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडली असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा... केंदीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला