मुंबई - प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संविधान आणि लोकशाही रक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन केले आहे.
![Independence Day was celebrated at headquarters of Maharashtra Pradesh Congress](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4148723_606_4148723_1565926912249.png)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आमदार थोरात म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी मोठा संघर्ष करून आणि बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रूजवली. त्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळाले, देशाची प्रगती झाली. पण दुर्दैवाने आज सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, सचिव राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.