मुंबई - काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांसोबत संपर्क साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
बाळासाहेब थोरात यांनी प्रमुख मुद्द्यांवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रीया
- अरविंद सावंत यांच्यावर टिका
सावंत यांनी झेंडा वंदन करताना केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना, आपण सर्व राज्याचे प्रतिनीधी असतो. स्वातंत्र्य दिनी असे वक्तव्य करणे अपेक्षीत नाही. आपण राज्याचे नेतृत्व आहेत, हि समज या नेतृत्वात नसल्याचे थोरात यांनी सांगितले आहे.
- नदी जोड प्रकल्प आमचा, सरकार फक्त निवडणूकांसाठी घोषणा करत आहे
मुख्यमंत्र्यांनी नदीजोड प्रकल्पावर केले भाष्य हे निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केले आहे. नदीजोड प्रकल्प हा आमच्याच सरकारचा कार्यक्रम होता.
- मोदींनी लोकसंख्या नियंत्रणाचा केलेला निर्धार हा काँग्रेसचाच कार्यक्रम
नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेली घोषणा ही नविन नाही, तो आमचाच कार्यक्रम आहे. देशात लोकसंख्या नियंत्रण होणे आवश्य आहे असेही थोरात यावेळी म्हणाले.
- जो पर्यंत केंद्र सरकार मदत देत नाही तो पर्यंत दिली असे म्हणता येणार नाही
राज्यात पूरस्थीती गंभीर होती. अजूनही तिथे मदतीची गरज आहे. राज्य सरकार मदत करत आदे पण केंद्राने देखील मदत केली पाहिजे. जरी केंद्राने मदत करण्याचे जाहिर केले असले, तरी प्रत्यक्षात मदत मिळे पर्यंत मिळाली असे मबणता येणार नाही.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या समवेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, सचिव राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.