ETV Bharat / city

'मुंबईच्या शेजारील जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आल्यास सर्वसामान्यांना ट्रेनमधून प्रवासाची मुभा' - मुंबई लोकल ट्रेन बातमी

मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात असल्याने आणखी लॉकडाऊनची गरज नाही. तसेच मुंबई शेजारील जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आल्यावर लोकल ट्रेनमध्ये सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा दिली जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

Mumbai tarin
मुंबई लोकल ट्रेन
author img

By

Published : Jul 27, 2020, 12:19 AM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे दररोज हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे विषाणूची भीती निर्माण झाली असताना मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात असल्याने आणखी लॉकडाऊनची गरज नाही. तसेच मुंबई शेजारील जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आल्यावर लोकल ट्रेनमध्ये सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा दिली जाईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal
मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

मुंबईत कोरोनाचा रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला होता. 22 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हा पासून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या बसेस, लोकल ट्रेन चालवल्या जात आहेत. मुंबईतील अनेक व्यवसाय, कार्यालये बंद आहेत. यामुळे मुंबईचे आणि राज्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवसांवर तर रुग्ण बरे होण्याचा दर 73 टक्क्यांवर पोहचला आहे. पालिकेची आणि खासगी रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत. यावरून कोरोना नियंत्रणात आला असल्याने आता लाॅकडाऊनची गरज नाही, असे स्पष्ट संकेत पालिका आयुक्तांनी दिले. आता मुंबई शेजारील जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आला, तर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात येईल, असे संकेत पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात - उद्धव ठाकरे

मुंबई अनलॉक करण्याबरोरबच लोकल सेवाही सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. एमएमआर क्षेत्रातील म्हणजेच मुंबई शेजारील जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यास आम्ही लॉकडाऊन कधीही उठवू शकतो, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच मुंबईतील कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना तो आकडा नियंत्रणात आला तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्यांसाठीही सुरु करणार, असेही आयुक्तांनी सांगितले. मुंबईचा रुग्णवाढीचा दर हा केवळ एक टक्का आहे. पण एमएमआर क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात मुंबईत दर दिवशी सरासरी १७०० पेक्षा रुग्ण वाढलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मुंबई अनलॉक करू शकतो. मात्र मुंबईशेजारील एमएमआर क्षेत्रात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ते प्रमाण कमी झाले पाहिजे, असे आयुक्त म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.