ETV Bharat / city

पालिका रुग्णालयात शीत शवपेट्या उपलब्ध केल्या जाणार

यासाठी मुंबईकरांकडून नाममात्र दर आकाराला जाणार असून मुंबईकरांना शवपेटीची गरज भासल्यास त्या त्वरित उपलब्ध करता याव्यात म्हणून शवपेट्यांची जबाबदारी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडे दिली जावी, अशी सूचना सईदा खान यांनी केली आहे.

mumbai municipality to avail mobile morgues in hospitals
author img

By

Published : Aug 1, 2019, 8:05 AM IST

मुंबई - एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक घरापासून लांब असल्यास मृतदेहावर लवकर अंत्यसंस्कार करता येत नाहीत. अशा वेळी तो मृतदेह शीतगृहात ठेवावा लागतो. मात्र, शीतगृहांमध्ये जागा नसल्यास नागरिकांची अडचण होते. मुंबईकरांची ही अडचण दूर व्हावी म्हणून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शीत शवपेट्या (डेड बॉडी फ्रीजर) उपलब्ध करून देण्याची मागणी, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी केली होती. ही मागणी पालिकेच्या आरोग्य विभागाने मंजूर केल्याने मुंबईकरांना आता पालिका रुग्णालयात नाममात्र दरात शीत शवपेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

सईदा खान (नगरसेविका, राष्ट्रवादी)

आता स्थायी समिती व सभागृहाच्या मंजुरीनंतर सर्वच पालिका रुग्णालयांमध्ये शीत शवपेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी मुंबईकरांकडून नाममात्र दर आकाराला जाणार असून, मुंबईकरांना शवपेटीची गरज भासल्यास त्या त्वरित उपलब्ध करता याव्यात म्हणून शवपेट्यांची जबाबदारी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडे दिली जावी, अशी सूचना सईदा खान यांनी केली आहे.

Intro:मुंबई - एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक घरापासून लांब असल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता ठेवावा लागतो. घरामध्ये अशाप्रकारे मृतदेह ठेवणे शक्य नसल्याने पालिका रुग्णालयाच्या शवागृहात ठेवावा लागतो. शवगृहात जागा नसल्यास अनेकवेळा अडचण निर्माण होते. मुंबईकरांची ही अडचण दूर करावी म्हणून महापालिकेच्या रुग्णालयांमधून शीत शवपेट्या (डेड बॉडी फ्रीजर) उपलब्ध करून देण्याचा मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी केली होती. ही मागणी पालिकेच्या आरोग्य विभागाने मंजूर केल्याने मुंबईकरांना आता पालिका रुग्णालयात नाममात्र दरात शीत शवपेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे मृत्यू नंतर मृतदेहाची होणारी हेळसांड थांबणार आहे. Body:वाढत्या नागरिकीरणाबरोबर बाहेरगावी कामानिमित्त राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कुटुंबापासून लांब असलेल्यांच्या घरात एखाद्याचा मृत्यू झाल्यास मुलगा, मुलगी तसेच नातेवाईक येईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. रात्री अपरात्री मृत्यू झाल्यास नातेवाईक येईपर्यंत दुसऱ्या दिवसापर्यंत मृतदेह ठेवावा लागतो. खासगी दवाखान्यात मृत्यू झाल्यास दवाखान्यातून तत्काळ मृतदेह नेण्यास नातेवाईकांना सांगितले जाते. मृतदेह घरी नेला तरी त्यावर तातडीने अंत्यसंस्कार होणे आरोग्याच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे असते. परंतू असे करणे शक्य नसल्याने कुटूंबीयांकडून मृतदेह पालिका रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. मात्र पालिका रुग्णालयातील शवगृहातही जागा नसल्याने कुटूंबियांना अडचण निर्माण होते.

अशा कुटुबांची संख्या मुंबईत मोठी आहे. असे प्रसंग मोठ्या प्रमाणात होत असतात. यावर उपाय म्हणून पालिका रुग्णालयात शीत शवपेट्या (डेड बॉडी फ्रीजर) उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी आरोग्य समितीत केली होती. या मागणीला आरोग्य समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे आता स्थायी व सभागृहाच्या मंजुरीनंतर सर्वच पालिका रुग्णालयात शीत शवपेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी मुंबईकरांकडून नाममात्र दर आकाराला जाणार असून मुंबईकरांना शवपेटीची गरज भासल्यास त्या त्वरित उपलब्ध करता याव्यात म्हणून शवपेट्यांची जबाबदारी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडे दिली जावी अशी सूचना सईदा खान यांनी केली आहे.

मृत्यूनंतरची हेळसांड थांबणार -
अनेक वेळा मृतदेह नातेवाईकांची वाट पाहात 24 तासांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ठेवावा लागतो. ठराविक वेळेनंतर मृतदेहाची हेळसांड होते, त्यातून दुर्गंधी पसरते. अशा स्थितीत मृतदेह ठेवण्यासाठी शीत शवपेटीची (डेड बॉडी फ्रीजर) गरज असते. महापालिकेच्या रुग्णालयात अशी सुविधा उपलब्ध केल्याने गरजूंना याचा लाभ होणार असल्याने मृत्यूनंतर होणारी हेळसांड थांबणार आहे.

सईदा खान यांची बाईट Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.