ETV Bharat / city

कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण - Mumbai Latest News

देशात काही ठिकाणी कोरोना लसीचे ड्रायरन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. कांजूरमार्ग येथील कोल्डस्टोरेज व्यवस्था लवकरच तयार होणार आहे. महापालिकेच्या वतीने 2500 कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

Mumbai Municipal Corporation Latest News
कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण
author img

By

Published : Jan 2, 2021, 5:17 PM IST

मुंबई - देशात काही ठिकाणी कोरोना लसीचे ड्रायरन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. कांजूरमार्ग येथील कोल्डस्टोरेज व्यवस्था लवकरच तयार होणार आहे. महापालिकेच्या वतीने 2500 कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबईत लस उपलब्ध होताच त्याच्या पुढील 24 तासांमध्ये या लसीच्या वितरणाला सुरुवात होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

लसीकरण केंद्रांचा आढावा

जगभरात प्रसार झालेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लवकरच लसीकरण केले जाणार आहे. मुंबईतही लसीकरणाची तयारी केली जात आहे. याचा आज पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आढावा घेतला. यावेळी बोलताना काकाणी म्हणाले की, लसीकरणासाठी मुंबई सज्ज झाली असून, सुरुवातीला मुंबईत 8 केंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच 4 रुग्णालयांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कांजूरमार्गला मध्यवर्ती कोल्डस्टोरेज केंद्र

कांजूरमार्ग येथे मध्यवर्ती कोल्डस्टोरेज बनवले जात आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये १ कोटी लस साठवून ठेवण्यात येणार आहेत. तर एफ साऊथमध्ये 10 लाख लसीच्या साठवणुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख नागरिकांचा डेटा जमा करण्यात आला असून, तो अपलोड करण्यात आला आहे. लस उपलब्ध झाल्यावर पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस मिळणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण

१० हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

केंद्र सरकारने लस पुरवल्यानंतर आता केवळ लसीकरणाची प्रक्रिया राबवली जाणे बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर, लसीकरण तातडीने पार पडावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने १८ डिसेंबरपासून जी उत्तर वॉर्डमधील धारावीपासून लसीकरण प्रशिक्षण सुरू केले होते. अशा प्रकारचे प्रशिक्षण पालिकेच्या विविध वॉर्डमध्ये पूर्ण झाले आहे. महापालिकेने प्रशिक्षण कार्यक्रमातून ७६२ मास्टर ट्रेनर तयार केले असून, त्यांनी आतापर्यत २५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. २५०० कर्मचाऱ्यांची ५०० पथक तयार केली जातील, त्यांच्याद्वारे लस दिली जाईल. त्याव्यतीरिक्त ५ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय आणखी ५ हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

प्रशिक्षणात काय ?

गेल्या १४ दिवसाच्या प्रशिक्षणात पहिल्या टप्प्यात लसीकरण कसे करावे, काय काय काळजी घ्यावी तसेच ओळख कशी पटवावी, याची माहिती डॉक्टर्स, आरोग्यसेवकांना, पालिका कर्मचार्‍यांना दिली गेली, तर दुसर्‍या टप्प्यात केंद्र सरकारने विकसित केलेल्या ‘कोविन अ‍ॅप’मध्ये व्यक्तीची माहिती कशी भरावी आणि त्याचा कसा वापर करावा, याची माहिती देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.