ETV Bharat / city

Omicron in Mumbai : मुंबई पालिका कोरोना आणि ओमायक्रॉनला रोखण्यासाठी सज्ज! - मुंबई कोरोना

मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या कालावधीत मुंबईत कोरोना विषाणूच्या दोन लाटा येऊन गेल्या. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या वाढून दिवसाला 11 हजार रुग्ण आढळून आले आहेत. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांची साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते.

Omicron in Mumbai
मुंबई पालिका
author img

By

Published : Dec 25, 2021, 7:53 PM IST

मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा ( Corona in Mumbai ) प्रसार आहे. गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना ओमायक्रॉनचेही ( Omicron in Mumbai ) रुग्ण आढळून येत आहेत. पुढील दोन महिन्यात ओमायक्राॅनचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) कोरोना आणि ओमायक्राॅनला वेळीच रोखण्यासाठी अँक्शन प्लॅन तयार केला आहे. विषाणूला रोखण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे.

रुग्णसंख्या वाढल्याने पालिका सज्ज -

मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या कालावधीत मुंबईत कोरोना विषाणूच्या दोन लाटा येऊन गेल्या. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या वाढून दिवसाला 11 हजार रुग्ण आढळून आले आहेत. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांची साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. मात्र डिसेंबर महिन्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 1 डिसेंबरला 108 रुग्ण आढळून आले होते 24 डिसेंबरला या त्यात वाढ होऊन 683 रुग्ण आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनचे आतापर्यंत 47 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पालिकेने नाताळ आणि नव वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे. येत्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढणार असल्याने पालिकेने रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील बेडस ( Covid Center Mumbai ) सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. रुग्णालयातील 13 हजार तसेच जंबो कोविड सेंटरमधील 17 हजार असे एकूण 30 हजार बेड्स सज्ज आहेत. त्याच बरोबर लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी कोविड सेंटरमध्ये 40 हजार बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच झोपडपट्टीत सोशल डिस्टंसिंग पाळणे शक्य नसल्याने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. यासाठी झोपडपट्टीतील रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी 30 हजार बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. रुग्णांना लागणारा औषधांचा साठा योग्य प्रमाणात राहील याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली.

एकूण 7 लाख 69 हजार 433 रुग्णांची नोंद -

मुंबईत 24 डिसेंबरपर्यंत कोरोनाच्या एकूण 7 लाख 69 हजार 433 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 47 हजार 258 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 368 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3227 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के ( Corona Patient Recovery Rate in Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1536 दिवस इतका आहे. मुंबईमधील 14 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.05 टक्के इतका आहे.

या दिवशी रुग्णसंख्या 200 च्या वर -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 20 डिसेंबरला 204, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

सहा वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा तर 22 डिसेंबरला सहाव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 47 वर -

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून 11,542 प्रवासी आले. त्यापैकी 52 प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. 1 नोव्हेंबर पासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात 94 प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीचे सहवासातील 19 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉजिटीव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत 47 (26 पुरुष, 21 स्त्री) जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 47 पैकी 27 रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.