ETV Bharat / city

गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; कोरोना नियमांचे पालन करण्याचे केले आवाहन - गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेची तयारी

येत्या रविवारी १९ सप्टेंबररोजी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या श्रीगणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी विसर्जनस्थळी महापालिकेने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Mumbai Municipal Corporation news
Mumbai Municipal Corporation news
author img

By

Published : Sep 18, 2021, 6:51 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी मुंबईत गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. येत्या रविवारी १९ सप्टेंबररोजी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या श्रीगणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी विसर्जनस्थळी महापालिकेने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विसर्जनाला गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध -

मुंबईत गेल्या वर्षी (मार्च २०२०) पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोनाचा प्रसार असल्याने गेल्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदाही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने राज्य सरकार व मुंबई महापालिकेने निर्बंध लागू केले आहेत. यामुळे भाविकांकडून उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. दीड, पाच आणि सात दिवसांच्या श्रीगणेशाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडल्यावर रविवारी अनंत चतुर्थीला दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.

२५ हजार कामगार सज्ज -

मुंबई महापालिकेने दहा दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनासाठी शहर व उपनगर येथील सर्व २४ विभागांमध्ये साधारणपणे २५ हजार कामगार, कर्मचारी, अधिकारी यांची व्यवस्था केली आहे. कोविडच्‍या पार्श्‍वभू‍मीवर गर्दी टाळण्‍यासाठी यंदादेखील बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. यानुसार १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळेदेखील कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त पालिका क्षेत्रातील ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळीही विसर्जनासाठी व्यवस्था असणार आहे, अशी माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली आहे.

पालिकेने केलेली व्यवस्था -

मुंबईतील गिरगाव, दादर, माहिम आदी चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्‍थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किनाऱ्यावरील रेतीमध्ये अडकू नये, यासाठी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत. तसेच, विविध ठिकाणी ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १४५ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट, ११६ सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्‍यादी सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आल्याची माहिती हर्षद काळे यांनी दिली.

पर्यावरणपूरक मूर्तींचे घरीच विसर्जन करा -

कोरोनाच्या कालावधीत विसर्जनाच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळण्यासाठी घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

महापालिकेचे आवाहन -

  • घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात
  • सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाच्या मंडपात आरती केल्यानंतर १० कार्यकर्ते गणेश मूर्ती विसर्जनस्थळी आणून पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करतील. पालिका कर्मचारी या मूर्त्यांचे विसर्जन करतील.
  • मंडपातील आणि विसर्जन करताना सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘कोविड-१९’ प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेऊन १५ दिवस झालेले असावे.
  • मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सतत हातधुणे या कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हेही वाचा - Ganeshotsav 2021 : अष्टविनायकापैकी एक आहे थेऊरचा चिंतामणी; जाणून घ्या कसे पडले हे नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.