मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्या वादानंतर आता महापौरांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात महापौर पेडणेकर यांच्याबाबत अश्लिल भाषेचा वापर केला आहे. ( Mayor Kishori Pednekar receive death threats ) तसेच, महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर पोलिसांत तक्रार दाखल करणार असून, कुटुंबियांसाठी पोलीस संरक्षणाची त्या मागणी करणार असल्याची माहिती आहे.
पत्रावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे
गुरुवारी संध्याकाळी हे पत्र महापौर बंगल्यावर पोहचले होते. या पत्राद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका अशा आशयाचे पत्र महापौर यांना पाठवण्यात आले आहे. पनवेलमधून कुरियरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. ( Mumbai Mayor Death Threats ) पत्रावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तसेच, यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
दुसऱ्यांदा अशा प्रकारची धमकी
गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्यांदा अशा प्रकारची धमकी किशोरी पेडणेकर यांना देण्यात आली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात फोनवरुन किशोरी पेडणेकर यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा निनावी पत्र थेट महापौर बंगल्यावर आले आहे.
राज्य सरकार विरोधात कडवा संघर्ष करण्याचा इशारा
किशोरी पेडणेकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. पोलिसांनी शेलार यांचा जबाब नोंदवून जामीन मंजूर केला. या दमदाटीला न घाबरता राज्य सरकार विरोधात कडवा संघर्ष करण्याचा इशारा शेलार यांनी दिला आहे.
हेही वाचा - Lady Police Commit Suicide : 𝟐𝟖 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरी गळफास