ETV Bharat / city

BMC Election 2022 : प्रभाग संख्या बदलल्याने निवडणूक लांबणार! - मुंबई महापालिका निवडणुक 2022

महाविकास आघाडी सरकारने प्रभागांची संख्या वाढवून २३६ केली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ( Eknath Shinde and Devendra Fadnavis Govt ) सरकारने त्यात बदल करून पुन्हा २२७ प्रभाग केल्याने नव्याने आरक्षण लॉटरी काढावी लागणार आहे. तसेच प्रभागानुसार नव्याने ( Mumbai Municipal Corporation Election ) मतदार याद्या कराव्या लागणार आहेत.

BMC Election 2022
BMC Election 2022
author img

By

Published : Aug 5, 2022, 8:06 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने प्रभागांची संख्या वाढवून २३६ केली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ( Eknath Shinde and Devendra Fadnavis Govt ) सरकारने त्यात बदल करून पुन्हा २२७ प्रभाग केल्याने नव्याने आरक्षण लॉटरी काढावी लागणार आहे. तसेच प्रभागानुसार नव्याने मतदार याद्या कराव्या लागणार आहेत. यामुळे मुंबई महानगरपालिकेची ( Mumbai Municipal Corporation Election ) निवडणूक लांबणीवर पडू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी प्रभाग संख्या बदलली : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. कोरोनामुळे निवडणूक वेळेवर होऊ शकलेली नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पालिकेच्या प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ केली. त्यानुसार ३१ मे ला ओबीसी शिवाय आणि सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण दिल्यावर २९ जुलैला ओबीसीसह आरक्षण लॉटरी काढण्यात आली. यासाठी ५० लाख रुपयांचा खर्च झाला होता. लॉटरी प्रक्रिया पार पाडणे, मतदार याद्या बनवणे आदी कामासाठी पालिकेच्या ३०० कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती. मात्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पालिका निवडणूक २३६ ऐवजी २२७ प्रभागानुसार होईल असा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे पालिकेने केलेला खर्च आणि कर्मचाऱ्यांनी केलेली मेहनत वाया गेली आहे.

..म्हणून निवडणुकीला होणार उशिर : मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग होते. त्यात महाविकास आघाडी सरकारने ९ प्रभागांची वाढ करून २३६ प्रभाग केले. पालिकेने त्यानुसार ३१ मे आणि २९ जुलै रोजी प्रभाग आरक्षण लॉटरी काढली. आता सरकारने प्रभाग रचना २२७ केल्याने पुन्हा नव्याने प्रभाग आरक्षण लॉटरी काढावी लागणार आहे. नव्याने लॉटरी काढण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. पालिकेने २३६ प्रभागानुसार मतदार याद्या बनवण्यात आल्या आहेत. आता २२७ प्रभाग झाल्याने पुन्हा नव्याने मतदार याद्या तयार कराव्या लागणार आहेत. पालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल असे सांगण्यात आले होते. मात्र नव्याने आरक्षण लॉटरी काढावी लागणार असल्याने तसेच मतदार याद्या तयार कराव्या लागणार असल्याने निवडणुकीला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची मेहनत, ५० लाख वाया : महाविकास आघाडीमधील शिवसेनेत फूट पाडली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार पाडले. भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री झाले. शिंदे आणि फडणवीस यांनी पालिकेच्या निवडणुका २३६ ऐवजी २२७ प्रभागानुसार होतील असा निर्णय घेतला आहे. यामुळे याआधी दोन वेळा लॉटरी काढण्यासाठी तसेच कागदपत्रे तयार करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. हा खर्च सरकारच्या निर्णयामुळे वाया गेला आहे. तसेच ३०० कर्मचाऱ्यांची मेहनतही वाया गेली आहे.

'जे योग्य आहे तेच व्हावे' : महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय आताचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार रद्द करत आहे. त्याचप्रमाणे आघाडी सरकारने केलेली वॉर्ड पुनरर्चना आणि आरक्षण हे सुद्धा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेला धरून जे योग्य आहे तेच व्हावे, अशी प्रतिक्रिया पालिकेतील माजी गटनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे.

'निवडणूक निष्पक्षपणे होण्यासाठी लक्ष घाला' : निवडणुकीसाठी चुकीच्या पद्धतीने केलेले सीमांकन विद्यमान सरकारने रद्द केले आहे. २३६ प्रभागाऐवजी २२७ प्रभाग वॉर्डांची जुनीच रचना कायम ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. वॉर्डची सोडत, लॉटरी पद्धतीत ज्या पद्धतीने मानवी हस्तक्षेप झाला आहे, त्यातही लक्ष घालून निवडणूक निष्पक्षपणे होईल यासाठी लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.

पालिकेतील वॉर्ड आरक्षण :
एकूण वॉर्ड - २२७ टक्के
अनुसूचित जाती - १५ टक्के
अनुसूचित जमाती - २ टक्के
ओबीसी - ६१ टक्के
महिला आरक्षण - ५० टक्के

पालिकेतील पक्षीय बलाबल :
शिवसेना - ९७
भाजपा - ८२
काँग्रेस - २९
राष्ट्रवादी -
समाजवादी पक्ष -
एमआयएम -
मनसे - 1

हेही वाचा - Fire Broke Out At Wadia Hospital : मुंबईतील वाडिया हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरला आग..

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.