मुंबई - मुंबई महानगरपालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) आपल्या मालमत्ता आणि भूखंड भाडेतत्वावर देण्यासाठी धोरण मंजूर ( BMC Lease Policy ) केले आहे. या धोरणामुळे महापालिकेला महसूल मिळणे अपेक्षित होते. मात्र पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मागील तीन - चार वर्षापासून भूखंडाच्या नुतनीकरणाची प्रक्रिया पुढे सरकली नसल्याचे स्पष्ट झाले ( Mumbai Municipal Corporation administration depressed ) आहे. यावर राजकीय पक्षांनी पालिका प्रशासनावर टिका केली आहे. पालिकेचा महसूल वाढवण्यासाठी या भूखंड आणि मालमत्तांचे नव्या धोरणानुसार नूतनीकरण करावे अशी मागणी राजकीय पक्षाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा - Sidhu Musewala Murder Pune Connection : शार्प शूटर संतोष जाधव हा गवळी गँगचा प्यादा!
पालिकेचे नवे धोरण - मुंबईमध्ये महापालिकेच्या मालकीचे ४ हजार १७७ भूखंड आहेत. हे भूखंड ९९९ ते १० वर्ष कालावधीसाठी भाडेकरारावर देण्यात आलेले आहेत. यातील ९९ वर्षापर्यंतचे भाडे करारावर असलेल्या काही भूखंडांचे भाडेकरार कधीच संपले आहे. यातील ९९ वर्षापर्यंतचे भाडे करारावर असलेल्या काही भूखंडांचे भाडेकरार कधीच संपले आहे. यातील बहुतेक भूखंड हे पालिकेने नाममात्र रक्कमेवर दिले आहेत. यातील अनेकांचे भाडेकरार संपुष्ठात आले तरी ते पालिकेकडे भाडेकरार नूतनीकरण करण्यासाठी येत नसल्याने पालिकेने २०१९ मध्ये धोरण मंजूर केले. या धोरणानुसार विकसीत जागेच्या रेडी रेकनर दरानुसार भाडे आकारावे व ३० वर्षाच्या कालावधीसाठी भाडेकरार नुतनीकरण करण्याचे पालिकेने ठरवले आहे. पालिकेच्या अनेक भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले असल्याने नियमानुसार हे बांधकाम काढल्याशिवाय भाडेकरार नुतनीकरण करता येत नाही. त्यामुळे ज्यांनी अनधिकृत बांधकाम काढून टाकून नियमाची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आहे. अशा ४ हजार पैकी २० टक्के भूखंडांचे नुतनीकरण केले जाणार आहे. तसा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. पालिकेने काही मक्तेदारांना संपर्क केला आहे अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेला वर्षाला ५०० कोटींचा महसूल मिळेल यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे धोरण आणले होते.
प्रक्रिया अद्याप पुढे सरकली नाही - मुंबई महापालिकेने भाडेकरारावर दिलेल्या सुमारे चार हजार भूखंडांपैकी २० टक्के भूखंडांचे नुतनीकरण नव्या धोरणानुसार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या भूखंडांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. प्रशासनाच्या वेळकाढूपणात मागील तीन - चार वर्षापासून नुतनीकरणाची प्रक्रिया लटकली आहे. अनेक भूखंडावर अतिक्रमणे असल्याने ती काढल्याशिवाय नुतनीकरण करण्यास प्रशासनाला अडचणी येत आहेत. फक्त चार - पाच भूखंडाच्या नुतनीकरणाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे नुतनीकरणाची प्रक्रिया अद्याप पुढे सरकली नसल्याचे समोर आले आहे.
काय आहे नवे धोरण - भाडेकराराने दिलेल्या भूभागांपैकी काही भूभागांचा करार कालावधी संपुष्टात आला आहे. त्यासाठी भूखंडांचे नुतनीकरण करण्यासाठी भुईभाडे ठरवण्याबाबत मार्गदर्शक तत्वांचे धोरण तयार करण्यात आले. त्याला महापालिकेच्या सुधार समिती आणि पालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे. सदर धोरणानुसार विकसीत जागेच्या प्रचलित रेडी रेकनर दरानुसार येणाऱ्या जमिनीच्या बाजार मूल्यानुसार भुईभाडे आकारले जाणार आहे. अशा भूखंडांचे ३० वर्षाच्या कालावधीसाठी नुतनीकरण केले जाणार आहे.
पालिका प्रशासन उदासीन, राजकीय टीका - मुंबई महानगरपालिकेचे महसूल वाढेल यासाठी हे धोरण आखले होते. मात्र पालिका प्रशासन उदासीन आहे. पालिकेला मालमत्ता, भूखंड आणि बांधकाम यामधून महसूल वाढवता येऊ शकतो. मात्र पालिका पाणी आणि इतर कर वाढवून नागरिकांकडून महसूल वाढवते हे चुकीचे आहे. भाडेतत्वार भूखंड देण्याबाबत धोरणाची अंमलबजावणी त्वरित करावी अशी आमची मागणी असल्याचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.
पालिकेने नव्याने करार करावे - भाडेकरार संपतो त्यानंतर अनेक प्रस्ताव पालिकेकडे येतात त्याचे नूतनीकरण करू नये. जे स्वतः येते नाहीत, अटी शर्थी भंग केल्या आहेत. त्यांचे करार नूतनीकरण करू नये. तो करार रद्द करावा. पालिकेने नव्याने करार करावा. पालिकेने आपले सर्व भूखंड ताब्यात घेऊन नव्या धोरणानुसार भाडेतत्वावर द्यावेत. जेणे करून पालिकेला चांगला महसूल मिळू शकेल अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी दिली आहे.
तर ही दुर्दैवी बाब - पालिकेने नवीन धोरण बनवले आहे. पालिकेला जीएसटीच्या बदल्यात मिळणार परतावा बंद होणार आहे. त्यानंतर मसूल कमी होऊ नये यासाठी हे धोरण बनवण्यात आले होते. पालिकेने अशा परिस्थितीत ४ हजार मालमत्ता नव्या धोरणानुसार भाडेतत्वावर देऊन पालिकेने सक्षम होणे गरजेचे आहे. पालिका आर्थिक दृष्टया सक्षम होत नसेल तर ही दुर्दैवी बाब आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नगरसेवक अश्रफ आझमी यांनी दिली आहे.
- भाडेकरारावर दिलेले भूखंड - ४१७७
- भूखंडांची वर्गवारी - एकूण मालमत्ता
- अनुसूची डब्ल्लू - १६०
- अनुसूची व्ही - २१
- अनुसूची एक्स - १९३
- अनुसूची वाय - ३८
- अनुसूची झेड - १ - महापालिका - ३७६४
हेही वाचा - महाविकास आघाडीच्या बैठकीकरिता आमदार आणि मंत्री ट्रायडेंट हॉटेलमध्ये येण्यास सुरुवात