ETV Bharat / city

Mumbai Municipal Corporation : कोरोना काळात नागरिकांसाठी सकारात्मक कार्य करता आले याचे समाधान - सुरेश काकाणी

तीनही लाटा रोखण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबईमधील कोरोना ( Mumbai corona ) रोखण्याचे महत्वाचे काम पालिकेच्या आरोग्य विभागाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Commissioner Suresh Kakani Retired ) यांनी केले आहे. आज (शुक्रवारी) अतिरिक्त आयुक्त काकाणी निवृत्त झाले आहेत.

सुरेश काकाणी
सुरेश काकाणी
author img

By

Published : Apr 29, 2022, 6:42 PM IST

Updated : Apr 29, 2022, 6:54 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा रोखण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबईमधील कोरोना ( Mumbai corona ) रोखण्याचे महत्वाचे काम पालिकेच्या आरोग्य विभागाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Commissioner Suresh Kakani Retired ) यांनी केले आहे. आज ( शुक्रवारी ) अतिरिक्त आयुक्त काकाणी निवृत्त झाले आहेत.

प्रतिक्रिया देताना निवृत्त अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

पालिकेचा अनुभव कसा होता ? : मुंबई महानगरपालिकेत पोस्टिंग ही माझ्या जीवनातील जबाबदारी आणि जोखीमची पोस्टिंग होती. त्याच दरम्यान कोविडचा प्रसार झाला. महामारीच्या कार्यकाळात काम करता आले. लोकांपर्यंत पोहचता आले. नागरिकांना उपचार देणे, त्यांना मृत्यूच्या दाढेतून परत आणणे ही आव्हानात्मक जबाबदारी पार पडता आली याचे समाधान आहे. समाधान असले तरी त्यात सुधारणा करण्यात वाव आहे याची जाणीव ठेवून मुंबई महापालिकेने पाऊले उचलली आहेत, असे काकाणी म्हणाले.

कोविडच्या सुरुवातीच्या काळात कोणती आव्हाने होती ? : सुरुवातीला पहिल्या लाटेच्या वेळेत रुग्णसंख्या किती वाढेल ? कोणती उपचार पद्धती द्यावी लागेल ? कोणत्या पद्धतीच्या मेडिकल सेवा आणि सुविधा द्यावी लागेल? याची काहीच माहीत नव्हती. याचा अंदाज काही दिवसात आल्यावर बेडची संख्या वाढवणे, औषधे उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुढे या सेवा वाढवत गेलो. कोविड सेंटर उभारली. यामुळे मुंबईकरांना बेड मिळणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळणे यासाठी काही अपवाद वगळता कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागलेला नाही, असे काकाणी यांनी संगितले.

कोरोनाच्या तीन लाटा परतवने कशामुळे शक्य झाले ? : कोरोनाच्या तीन लाटा परतवने हे मुंबई महापालिकेच्या टीममुळे हे शक्य झाले. अधिकारी कर्मचारी, एनजीओ, खासगी संस्था, लोकप्रतिनिधी, मीडिया यांचा हातभार आणि सहभाग लाभला यामुळे आता आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. चांगल्या स्थितीमध्ये असलो तरी पण काळजी घेणे आवश्यक आहे. चौथी लाट येऊ नये यासाठी तुम्ही आम्ही एकत्र काम करून नागरिकांसाठी काम केले, कोविडच्या नियमांचे पालन केले तर नक्कीच आपण चांगल्या स्थितीत असू शकतो, असे काकाणी म्हणाले.

चौथ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज आहे का ? : मुंबई महापालिका सदैव तयार आहे. ३६ हजार बेड्स तयार आहेत. त्यापैकी केवळ १७ बेडवर रुग्ण आहेत. गरज पडली तर आयसीयू आणि ऑक्सिजनची गरज पडत नाही. मात्र आयसीयू आणि ऑक्सिजनची तयारी ठेवली आहे. दोन दिवसात शंभरहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यात काही प्रमाणात घट झाली आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि ट्रेसिंग ही कारवाई सुरूच आहे. त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये असे प्रयत्न सुरु आहेत, असे काकाणी म्हणाले.

हेही वाचा - Jayant Patil Criticized Raj Thackeray :...तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाहीत; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला

Last Updated : Apr 29, 2022, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.