ETV Bharat / city

अग्निशमन दलातील २५ टक्के रिक्त पदे भरण्यास पालिका आयुक्तांची परवानगी - मुंबई अग्निशमन दल

रिक्त पदांची दखल घेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही पदे भरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू होईल, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Oct 4, 2020, 9:02 PM IST

Updated : Oct 4, 2020, 9:08 PM IST

मुंबई - महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या अग्निशमन दलातील २५ टक्के पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. रिक्त पदांची दखल घेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही पदे भरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू होईल, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

अग्निशमन दलातील २५ टक्के रिक्त पदे भरण्यास पालिका आयुक्तांची परवानगी

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या रिक्त पदांची आकडेवारी समोर आली होती. याबाबत दिनांक ६ सप्टेंबर २०२० रोजी लेखी तक्रार केली होती. यानुसार मुंबई अग्निशमन दलाने अनिल गलगली यांस कळविले आहे की, मुंबई महापालिकेने दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकामुळे रिक्त पदे भरता आलेली नव्हती. मात्र ९ सप्टेंबर २०२० रोजी महापालिका आयुक्तांनी नवीन भरतीवर लावण्यात आलेल्या निर्बंधापासून अग्निशमन खाते वगळण्यास मान्यता दिली आहे. यानुसार ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

अग्निशमन दल आणखी सक्षम होणार

आजच्या घडीला मुंबई अग्निशमन दलात २५ टक्के पदे रिक्त असून यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी व्यक्तिशः प्राधान्य दिले आहे. मुंबई अग्निशमन दल ही अत्यावश्यक सेवा असून रिक्त पदे भरल्यानंतर कामकाजास वेग येईल, अशी प्रतिक्रिया अनिल गलगली यांनी दिली. रिक्त पदे भरल्याने अग्निशमन दल आणखी सक्षम होणार आहे.

हेही वाचा - आरेतील त्या 'काळरात्री'ला एक वर्ष पूर्ण, पर्यावरण प्रेमींकडून मृत झाडांना श्रद्धांजली

Last Updated : Oct 4, 2020, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.